साडेतीस हजार रुपयांची विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:39 IST2021-04-09T04:39:06+5:302021-04-09T04:39:06+5:30

चामाेर्शी शहरात मागील काही दिवसांपासून अवैध दारूविक्री माेठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु विक्रेत्यांना रंगेहात पकडण्यात पाेलिसांना यश मिळत ...

Foreign liquor worth Rs 35,000 seized | साडेतीस हजार रुपयांची विदेशी दारू जप्त

साडेतीस हजार रुपयांची विदेशी दारू जप्त

चामाेर्शी शहरात मागील काही दिवसांपासून अवैध दारूविक्री माेठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु विक्रेत्यांना रंगेहात पकडण्यात पाेलिसांना यश मिळत नव्हते. गुरूवारी चामोर्शी शहरातील अवैध दारू विक्रेता प्रमोद मंडल हा राहत्या घरातून दारूची अवैध विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्रमाेद मंडल याच्या घरी दारूबंदीबाबत धाड टाकली असता ८ हजार ४०० रुपये किमतीच्या विदेशी कंपनीच्या २९ नग बियरचे टिन, तसेच दुसऱ्या कंपनीचे ११ हजार ७०० रुपये किमतीचे ३९ नग बीअर टिन, याशिवाय १० हजार ५०० रुपये किमतीच्या १८० मिली मापाच्या ३५ नग निपा असा एकूण ३० हजार ६०० रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी प्रमोद मंडल (३२)रा. चामोर्शी व अवैध दारूचा पुरवठा करणारा आशिष गयाली रा. श्रीनिवासपूर याच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, निशा खोब्रागडे, पाेलीस नाईक ज्ञानेश्वर लाकडे, एस.पी.ओ. चंपत मडावी यांनी केली.

Web Title: Foreign liquor worth Rs 35,000 seized