शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

यावर्षी 212 गावांना बसू शकतो पुराचा फटका; लाईफ गार्ड, रबर बोट तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

यावर्षीही २१२ गावांमध्ये संपर्क तुटण्याच्या शक्यतेने व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी दक्षिण गडचिरोलीतील ६ तालुक्यांमधील गावांचा पुराच्या पाण्याचा फटका बसण्याचा अंदाज महसूल यंत्रणेने व्यक्त करून त्यादृष्टीने तयारी सुरू केली.  बारमाही रस्ते आणि पूल नसल्यामुळे पुराचा वेढा पडतो. त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दरवर्षी काहींचा बळीही जातो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्याचे वेध लागले की जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची धावपळ सुरू होते. दरवर्षी २०० पेक्षा जास्त गावांना कोणत्याही वेळी पुराचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या गावांमध्ये रेशनचा साठा, औषधी आणि बचाव पथकाला सतर्क ठेवले जात आहे.यावर्षीही २१२ गावांमध्ये संपर्क तुटण्याच्या शक्यतेने व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी दक्षिण गडचिरोलीतील ६ तालुक्यांमधील गावांचा पुराच्या पाण्याचा फटका बसण्याचा अंदाज महसूल यंत्रणेने व्यक्त करून त्यादृष्टीने तयारी सुरू केली. बारमाही रस्ते आणि पूल नसल्यामुळे पुराचा वेढा पडतो. त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दरवर्षी काहींचा बळीही जातो. 

तीन महिन्यांसाठी एसडीआरएफची चमू द्याजिल्ह्यातील दरवर्षीची पूरपरिस्थिती पाहता राज्य आपत्ती निवारण पथकाची एक चमू पावसाळ्याच्या तीन महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात राहावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव मंजूर केल्यास या चमूला आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पाठवून पुरात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल.- संजय मिनाजिल्हाधिकारी

सर्व ग्रा. पं. ना वीजरोधक यंत्रणा-    दरवर्षी वीज पडून होणाऱ्या दुर्घटनेत काही लोकांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी वीजरोधक यंत्रणा बसविली. -   जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारतीवर वीजरोधक यंत्र बसविण्यात आले. यामुळे परिसरात पडणारी वीज खेचून घेतली जाईल.

या ठिकाणी येतो पूर

जिल्ह्यात गोदावरी, प्राणहिता, वैनगंगा आणि इंद्रावती या प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना पूर येतो. ४७ गावे नदीच्या काठावरच आहेत. १११ गावांना हमखास पुराचा फटका दरवर्षी बसतो. पुरामुळे १२ प्रमुख महामार्ग खंडित होतात. काही ठिकाणी यावर्षी पूल तयार झाले असल्यामुळे पुराचा फटका बसणाऱ्या गावांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

बचाव साहित्य वितरित - पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात १४ रबर बोट तयार आहेत. याशिवाय काही बोटीची दुरुस्ती सुरू आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आणखी ५ बोटी खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे यावर्षी जवळपास २५ बोट उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. 

२४ तास नियंत्रण कक्ष- जिल्हाधिकारी कार्यालयासह पोलीस अधीक्षक कार्यालय आणि तालुकास्तरावर तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. - शहरी भागासाठी नगर परिषद, नगर पंचायतीची यंत्रणाही सतर्क राहणार आहे. मनुष्यबळाअभावी ते २४ तास सेवा देणार नाही. 

 

टॅग्स :floodपूर