शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत एकदाही भरडाई मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या आविका संस्था शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान संस्थेच्या आवारात उघड्यावर ठेवतात. शासन परिपत्रकानुसार त्या धानाची उचल दोन महिन्यात करून तो भरडाईसाठी पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात भरडाईला वेळ लागत असल्यामुळे दोन महिन्यात सर्व धानाची भरडाई करणे आदिवासी विकास महामंडळाला अशक्य होत आहे.

ठळक मुद्देअविकास संस्थांचे नुकसान : विलंबामुळे वाढताहे तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांकडील धान शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी केल्यानंतर त्याची भरडाई (मिलिंग) दोन महिन्यात करणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्ष गेल्या पाच वर्षात एकाही वर्षी या नियमाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आदिवासी विकास महामंडळाला दरवर्षी धान भरडाईसाठी एक ते दिड वर्षाचा कालावधी लागला आहे. त्यामुळे तूट वाढून त्याचा भुर्दंड आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना सहन करावा लागत आहे.आदिवासी विकास महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या आविका संस्था शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान संस्थेच्या आवारात उघड्यावर ठेवतात. शासन परिपत्रकानुसार त्या धानाची उचल दोन महिन्यात करून तो भरडाईसाठी पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात भरडाईला वेळ लागत असल्यामुळे दोन महिन्यात सर्व धानाची भरडाई करणे आदिवासी विकास महामंडळाला अशक्य होत आहे. मग एक ते दिड वर्ष पडून राहिलेल्या धानाच्या भरडाईतील तूट वाढणे नैसर्गिक असताना शासनाने यावर्षी केवळ १ टक्क्याची तूट मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा जास्त तूट आल्यास संबंधित आविका संस्थांच्या कमिशनमधून दिड टक्के भुर्दंड वसूल केला जाणार आहे. यामुळे यावर्षी धान खरेदी केंद्र घेण्यासाठी अनेक संस्थांनी उत्सुकता दाखविलेली नाही. ही स्थिती कायम राहिल्यास शेतकºयांना नाईलाजाने कमी भावात व्यापाऱ्यांना धान विकून नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.भरडाईसाठी तांदूळ देताना तो बँक गॅरंटीच्या प्रमाणात किंवा अग्रिम लॉटच्या प्रमाणात राईस मिलर्सला देण्याचे बंधन आहे. ज्या प्रमाणात तांदूळ जमा होईल त्याच प्रमाणात धानाची खरेदी केंद्रांवरून उचल देण्यात येते. त्यामुळे धान बऱ्याच कालावधीपर्यंत केंद्रावर पडून राहतो. गेल्या पाच वर्षातील भरडाईचा कालावधी पाहिल्यास २०१४-१५ मध्ये भरडाईसाठी १५ महिने लागले. त्यामुळे वजनात १.७५ टक्के घट आली. २०१५-१६ मध्ये १२ महिने कालावधी लागला. त्यावेळी २.३० टक्के घट आली. २०१६-१७ मध्ये १४ महिने लागल्यामुळे २.२४ टक्के घट, २०१७-१८ मध्ये १५ महिने लागल्यामुळे २.९० टक्के तर २०१८-१९ मध्ये भरडाईसाठी १३ महिने लागल्यामुळे १.२१ टक्के घट आली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली