शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पाच तालुके काेराेनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 5:00 AM

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पाेहाेचली हाेती. तसेच दुसऱ्या लाटेत ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे ही लाट कधी ओसरेल याची प्रतीक्षा नागरिक करीत हाेते. राज्य शासनाने उपाययाेजना म्हणून राज्यभरात लाॅकडाऊन जाहीर केले. तसेच प्रवासावरही बंधणे घालण्यात आली हाेती. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या हाेत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

ठळक मुद्देआरमाेरी, धानाेरा, एटापल्ली, काेरची व कुरखेडा तालुक्यांमध्ये १५ पेक्षा कमी सक्रीय रूग्ण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आरमाेरी, धानाेरा, एटापल्ली, कुरखेडा, काेरची या पाच तालुक्यांमध्ये १५ पेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहेत. हे तालुके लवकरच काेराेनामुक्त हाेण्याची शक्यता आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पाेहाेचली हाेती. तसेच दुसऱ्या लाटेत ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे ही लाट कधी ओसरेल याची प्रतीक्षा नागरिक करीत हाेते. राज्य शासनाने उपाययाेजना म्हणून राज्यभरात लाॅकडाऊन जाहीर केले. तसेच प्रवासावरही बंधणे घालण्यात आली हाेती. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या हाेत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बाधित रुग्णांची संख्या ओसरायला लागली. जिल्ह्यात आता केवळ ३६१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातही सर्वाधिक १०६ रुग्ण गडचिराेली तालुक्यातील आहेत. त्यानंतर चामाेर्शी तालुक्यात ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. काेरची तालुक्यात आता केवळ १ रुग्ण आहे. कुरखेडा तालुक्यात १०, एटापल्ली १०, धानाेरा ५ व आरमाेरी तालुक्यात केवळ १३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांची संख्या कमी व मुक्त हाेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने लवकरच हे तालुके काेराेनामुक्त हाेतील अशी शक्यता आहे.लाॅकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

४४ काेराेनामुक्त तर ३३ नवीन बाधित

गडचिरोली जिल्ह्यात ३३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच रविवारी ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या २९ हजार ९१२ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार ८१७ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ३६१ काेराेना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एकाही मृत्यूची नोंद नाही.

नवीन ३३ बाधित

गडचिरोली तालुक्यातील ११, अहेरी तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील ५, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ५, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ६, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ४ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या