पाच लाखांचा बोनस रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:20+5:30

२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही.

Five lakh bonus stalled | पाच लाखांचा बोनस रखडला

पाच लाखांचा बोनस रखडला

Next
ठळक मुद्देचौकशीची मागणी : कचलेर गावातील मजुरांची बीडीओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील हालेवारा ग्राम पंचायत अंतर्गत कचलेर गावातील मजुरांनी २०१९ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. काही दिवसानंतर मजुरांना तेंदूपत्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही. जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटूनही मजूर तेंदू बोनसपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार कचलेरवासीयांनी बीडीओंकडे केली आहे.
२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच देण्यात आली. परंतु तत्कालीन ग्रामसेवक व पेसा समितीने संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली नाही. परिणामी तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर बोनसच्या रकमेपासून वंचित राहिले. उन्हाळ्यात हमखास रोजगार देणारा हंगाम म्हणून तेंदू हंगामाची ओळख आहे. त्यामुळे दुुर्गम भागातील संपूर्ण कुटुंब तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. जवळपास १५ ते २० दिवस हा हंगाम चालतो तर काही गावांमध्ये ८ ते १० दिवस हा हंगाम चालत असतो. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार मिळतो. या रोजगाराच्या भरवशावर नागरिक खरीप हंगामातील शेतीचे नियोजन करतात. तेंदू हंगाम आटोपल्यानंतर ८ ते १० दिवसांत मजुरीची रक्कम दिली जाते. त्यानंतर तीन ते चार महिन्यातच बोनसही संबंधित मंजुरांच्या बँक खात्यात जमा केला जातो. परंतु जवळपास दीड वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कचलेर गावातील मजुरांना बोनस मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.

८१ हजार रूपये गेले कुठे?
दीड वर्षापासून कसनसूर येथील ५२ मजुरांना तेंदू बोनस मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करीत आहेत. दोन ते तीन वेळा बँकेत जाऊन चौकशी केली असता, बँक व्यवस्थापकांनी ८१ हजार रूपयांची रक्कम कमी असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळाल्याशिवाय बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करता येणार नाही, असे सांगितले. ८१ हजार रूपये गेले कुठे, अशी विचारणा केली असता, पेसा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी बीडीओंकडे केली.

Web Title: Five lakh bonus stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.