रामाळा व नागेपल्लीतील अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:35 PM2018-02-17T23:35:44+5:302018-02-17T23:36:03+5:30

Five injured in road accident in Ramala and Nagepally | रामाळा व नागेपल्लीतील अपघातात पाच जखमी

रामाळा व नागेपल्लीतील अपघातात पाच जखमी

Next

आॅनलाईन लोकमत
चामोर्शी/आलापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रामाळा व अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे झालेल्या दोन अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
ज्ञानेश्वर गंगा मेडीवार हे आपल्या कुटुंबासह मार्र्कंडा येथील जत्रा बघून रामाळा गावाकडे जात होते. दरम्यान समोरून येणाºया दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ज्ञानेश्वर मेडिवार यांच्यासह पत्नी सोनी मेडिवार व दोन मुले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना भेंडाळा येथील रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.
नागेपल्ली येथील दूध शितकरण केंद्राजवळ शनिवारी दुपारी ४.३० वाजता दोन ट्रकमध्ये जबर धडक झाली. सीजी ०७ सी ३६८७ क्रमांकाचा ट्रक आलापल्लीवरून भोपालपल्ली येथे जात होता. तर एमएच ३१ सीक्यू २२९९ या क्रमांकाचा ट्रक आष्टी मार्गे चंद्रपूरकडे जात होता. या दोन्ही ट्रकची नागेपल्ली येथील वळणावर जोरदार धडक झाली. यात एमएच ३१ सीक्यू २२९९ क्रमांकाच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहेरी येथे भरती केले. एपीआय बाळासाहेब शिंदे, पीएसआय पाटील, वाहतूक पोलीस बेगलाजी दुर्गे यांनी भेट घटनास्थळाला दिली.

Web Title: Five injured in road accident in Ramala and Nagepally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.