शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अखेर प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीविरूद्ध एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीच्या आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गार्इंपैकी १६३ गायी गायब आहेत. त्या गाई सदर कंपनीच्या संचालकांनी पळवून परस्पर विकल्याचा पशुसंवर्धन विभागाचा ठपका आहे. त्यामुळे त्या गायी दोन दिवसात परत आणा, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा कंपनीला दि.२५ रोजी दिलेल्या पत्रात दिला होता.

ठळक मुद्देफ्रिजवाल गाई प्रकरण : पळविलेल्या गाई आणल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लष्कराच्या जवळपास दोन कोटी रुपये किमतीच्या फ्रिजवाल गाई शेतकऱ्यांच्या नावावर आणून हडपण्याचा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीचा डाव ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेने उधळल्या गेल्यानंतर अखेर सदर कंपनीविरूद्ध पशुसंवर्धन विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरूवारी (दि.२६) रात्री या प्रकरणाची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे शासनाची आणि शेतकºयांची फसवणूक करण्याचे हे प्रकरण सदर कंपनीला आता चांगलेच महागात पडणार आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीच्या आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गार्इंपैकी १६३ गायीगायब आहेत. त्या गाई सदर कंपनीच्या संचालकांनी पळवून परस्पर विकल्याचा पशुसंवर्धन विभागाचा ठपका आहे. त्यामुळे त्या गायी दोन दिवसात परत आणा, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा कंपनीला दि.२५ रोजी दिलेल्या पत्रात दिला होता. मात्र दि.२६ ला संध्याकाळपर्यंत कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.वाय.एस.वंजारी यांनी गुरूवारी रात्री आरमोरीला जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली. वृत्त लिहीपर्यंत त्याबाबतची प्रक्रिया सुरूच होती.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कंपनीने भागधारक म्हणून दाखविलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन आणि वाहतुकीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये प्रतिगाय देण्यास संमतीपत्र देणाºया शेतकऱ्यांना दि.२४ व २५ डिसेंबरला गार्इंचे वाटप करण्यात आले. दि.२४ ला ४४ तर दि.२५ ला ६२ गाईी-वासरांचे वाटप शेतकऱ्यांना ईश्वरचिठ्ठीने करण्यात आले.अनेक गायींची प्रकृती दोन महिन्यात बिघडल्याने ५ हजार रुपये देऊन गायी नेण्यास काही शेतकरी तयार नव्हते. त्यामुळे गायींची स्थिती पाहून ती किंमत कमी करून इच्छुक शेतकऱ्यांना गार्इंचे वाटप करण्यात आले.कंपनीने परस्पर विकलेल्या गाई धडधाकट असून त्या दुधाळू असल्यामुळे त्या गाई घेण्यासाठी अजून बरेच शेतकरी इच्छुक आहेत. मात्र कंपनीच्या संचालकांनी गायब केलेल्या १६३ गायी परतच आणल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.दि. २१ ला जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तथा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीचे तीन संचालक हजर होते. त्यात गाई शेतकऱ्यांनाच वाटप करण्याचा स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना तो डावलून कंपनीच्या संचालकांनी शिवणीच्या फार्मवरून परस्पर गाई पळविल्या. त्यामुळे कोणकोणते गुन्हे दाखल होतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.आयुक्त कार्यालयाकडून चौकशी समितीसदर प्रकरणात शासनाची आणि शेतकऱ्यांची कशी दिशाभूल झाली हे ‘लोकमत’ने समोर आणताच पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) कार्यालयाने पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बन्सोडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने दि.२४ व २५ डिसेंबरला शिवणीत जाऊन सदर कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली. शिवाय गायींना कोणत्या स्थितीत ठेवले होते, त्यांचे कसे हाल होऊन त्या मरणाच्या दारी पोहोचल्या हे प्रत्यक्ष पाहिले. ही समिती आता आपला अहवाल पशुसंवर्धन आयुक्तांना सादर करणार आहे.गोहत्याबंदीचा गुन्हा नोंदवादरम्यान या प्रकरणात केवळ प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचाच दोष नसून शासनाच्या अधिकाऱ्यांचाही दोष असल्याचा आरोप करत काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी सर्वांवर गोहत्या बंदीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाकपचे माजी जि.प.सदस्य अमोल मारकवार, राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, शिवसेनेचे तालुका प्रमुख महेंद्र शेंडे व काही शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेतून ही मागणी केली.

टॅग्स :cowगाय