असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वारंवार प्रकाशित केल्याने अखेर पेट्राेलपंप ते हनुमान वाॅर्ड साईबाबा मंदिरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यावरील डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांना साेयीचे झाले आहे.
पेट्रोल पपं ते हनुमान वाॅर्डातील साईबाबा मंदिरापर्यंत असणारा रस्ता गेल्या एक वर्षांपासून जागाेजागी उखडला हाेता. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी अडचणी येत हाेत्या. सदर मार्गावर अनेकदा अपघात घडले. पादचारी तसेच वाहतूकदारांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधींच्या नजरेस ही बाब अनेकदा आणून दिली. परंतु समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ‘लोकमत’ने ‘खड्डेमय रस्त्याची दयनीय स्थिती’ या शीर्षकाखाली अनेकदा बातमी प्रकाशित केली. याचा परिणाम जनतेच्या मनात प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागल्याने प्रशासनास जाग येऊन अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.