शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

क्षेत्र सहायकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: August 19, 2014 23:42 IST

अग्नी संरक्षकाच्या लाईन टाकण्याच्या कामाबाबत मजुरांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या तसेच देयकाची उचल करून शासन प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुलचेरा पोलिसांनी मार्र्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राचे

माहितीचा अधिकारात उघड : बनावट स्वाक्षऱ्या करून ३५ हजार हडपलेघोट : अग्नी संरक्षकाच्या लाईन टाकण्याच्या कामाबाबत मजुरांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या तसेच देयकाची उचल करून शासन प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुलचेरा पोलिसांनी मार्र्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक श्रावण देवाजी खोब्रागडे याच्यावर ४२०, ४६५, ४६६, ४७१, ४७४, ४७७ (अ) व ४०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वनविभागात खळबळ माजली आहे. मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील मोजीकराव गणपत आरके यांनी १४ आॅगस्टला क्षेत्र सहाय्यक श्रावण देवाजी खोब्रागडे यांच्याविरोधात मुलचेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मोजीकराव आरके यांनी म्हटले होते की, घोट येथील तरूण शहा हे माझ्या घरी आले व त्यांनी तुम्ही वनविभागात कोपरअल्ली ते मल्लेरा मार्गावर अग्नी संरक्षक लाईनचे काम केले आहे का, अशी विचारणा केली. त्यावर आपण अशा प्रकारचे काम केले कधीही केले नसल्याचे सांगितले. त्यानंतर तरूण शहा यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कोपरअल्ली ते मल्लेरा मार्गाच्या अग्नी संरक्षक लाईनच्या कामाच्या देयकाच्या प्रती आपल्याला दाखविल्या. सदर प्रत पाहिली असता, या देयकामध्ये भगवान गणपत चौधरी आणि इतर ७ मजुरांनी २५ जानेवारी २०१३ ते ११ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत अग्नी संरक्षक लाईनचे काम केल्याचे दिसून आले. तसेच या कामापोटी ३५ हजार ९७१ रूपयाचे देयक मजुरी म्हणून मंजूर करण्यात आल्याचेही देयकाच्या प्रतीमध्ये आढळून आले. दुसऱ्या प्रतीमध्ये मजुरांच्या नावाची यादी होती. या यादीत भगवान चौधरी, अनंतराव बावणे, पुणेश्वर बावणे रा. मल्लेरा तसेच कोपरअल्ली येथील विलास नैताम, साईनाथ मंटकवार, अनिल बुरमवार, खुशाल मंटकवार यांच्यासह माझ्याही नावाचा समावेश असल्याचे दिसून आले. तसेच या देयकामध्ये समावेश असलेल्या सर्व मजुरांच्या बोगस स्वाक्षऱ्या व काही मजुरांचे अंगठेही मारल्याचे दाखविण्यात आले होते. माझ्या नावासमोर ४४७६.४२ रूपयाची तरतूद केली होती, असेही मोजीकराव आरके यांनी तक्रारीत नमुद केले होते. सदर प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, तत्कालीन क्षेत्र सहाय्यक श्रावण खोब्रागडे याने बनावट देयक तयार करून रक्कम हडपल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)