शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ग्रामसभांना खनिज संपत्तीचे अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:58 PM

पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.

ठळक मुद्देविजय मानकर यांचे आवाहन : गडचिरोली येथे मूलनिवासी-आदिवासी संमेलन, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पेसा कायद्याने आदिवासींना जल, जंगल, जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र खनिज संपत्तीचे अधिकार प्रधान केले नाहीत. आदिवासी पट्यात सर्वाधिक खनिज संपत्ती आहे. खनिज संपत्तीचे अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय मुलनिवासी-आदिवासी,ओबीसी व डीटीएनटी महासंमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी विजय मानकर मार्गदर्शन करीत होते. माजी आमदार हिरामन वरखडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी, अनिल केरामी, प्रदेशाध्यक्ष राजेश वालदे, एपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, सचिव विजय कृपाकर, कोषाध्यक्ष मोनाली लांजेवार, गंगाराम आतला, सुखदेव गावळे, अर्जूनसिंग ठाकूर, भगवान नन्नावरे, डॉ. दिवाकर उराडे, नंदकिशोर रंगारी, रूपेश निमसरकार, सुरेश गावळे, , बालाजी बावणे, शेषराज गावळे, श्रीकांत नैताम, आकाश आंबोरकर, प्रा. संजय पिठाले आदी मान्यवर उपस्थित होते.पूढे मार्गदर्शन करताना विजय मानकर म्हणाले ज्या भागात आदिवासी राहतात त्या भागात देशातील एकूण खनिज संपत्तीच्या सुमारे ७० टक्के खनिज संपत्ती आहे. या खनिज संपत्तीवर उद्योजकांचा नेहमीच डोळा राहला आहे. ही खनिज संपत्ती खणन करण्यासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक करावी. तसेच कंपनीच्या नफ्यात ग्रामसभेचा वाटा असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी देशाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतुद असावी यासाठी लढा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाला बाध्य करण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.प्रास्ताविक एपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू वाघमारे, संचालन प्रवृत्ती वाळके तर आभार रूपेश निमसरकार यांनी मानले. यशस्वतेसाठी राहूल वैरागडे, सुशील मेश्राम, कवडू दुधे, अरविंद वानखेडे, दिलीप बांबोळे, अतुल मांदाडे, सुरज तावाडे, जितू डोंगरे, मनोज बारसिंगे, दुर्याेधन रायपूरे, तुषार हेटकर, अक्षय मडावी, अरविंद गजभीये, विनोद आतला, सुरज कोवे, धनंजय सहदेवकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला ग्रामसभा व आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.