लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या सिनभाट्टी जंगलात दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेतला असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जंगलात गस्त करीत असताना त्यांच्या दिशेने नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. पोलीस पथकाने त्या परिसरात शोध घेता असता एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह हाती लागला.
गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत महिला नक्षलवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 20:16 IST