शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
2
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
3
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
4
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
5
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
6
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
7
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
8
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
9
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
10
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
11
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
12
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
13
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
14
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
15
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
16
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
17
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
18
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
19
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
20
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

राज्य शासनामुळे शेतकरी उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 5:00 AM

विद्यमान महाविकास आघाडी शासनाने विमा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटी टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी कंपन्यांचा फायदा करण्यात सरकार मग्न आहे. अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. हजाराे हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने काेणतीही मदत केली नाही. केवळ केंद्र शासनाकडे बाेट दाखविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्य शासन राबवित असलेल्या चुकीच्या धाेरणांमुळे मागील दाेन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे, असा आराेप माजी आ. अतुल देशकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विद्यमान महाविकास आघाडी शासनाने विमा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटी टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी कंपन्यांचा फायदा करण्यात सरकार मग्न आहे. अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. हजाराे हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने काेणतीही मदत केली नाही. केवळ केंद्र शासनाकडे बाेट दाखविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. पूर्वीच्या तुलनेत विजेचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीजबिल भरणे शेतकरी व सामान्य नागरिकांना अशक्य झाले आहे. अशातच ज्या नागरिक व शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला जात आहे. वीजपुरवठा कापल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान करपले आहे. आता ताे शेतकरी वीजबिल कसा भरणार, असा प्रश्न देशकर यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला खा.अशाेक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे महामंत्री तथा नगरसेवक प्रमाेद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, संजू गजपुरे, अनिल पाेहणकर, शेख आदी उपस्थित हाेते.

-  विदर्भात मागील आठ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरी चिंतातूर झाला असल्याचे दिसून येत आहे. मात्र मुंबईत बसून शासन चालविणाऱ्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांनी अजुनही पंचनामे केले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याचा धाेका आहे. जगाचा पाेशिंदा असलेल्या शेतकऱ्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करून फार माेठे पाप करीत आहे, असा आराेप खासदार अशाेक नेते यांनी पत्रकारपरिषदेला केला आहे.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते