शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याला पाठ; चार पटीने घटली शेतकरी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:58 IST

एक रुपयात विम्याची योजना बंद : आले केवळ २४ हजार २४२ अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने २०२५-२६ च्या खरीप हंगामापासून राज्यात पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात १ जुलैपासून खरीप पीक विमा उतरविण्यास सुरुवात झाली. ३१ जुलै रोजी ही मुदत संपली. दरम्यान महिनाभरात केवळ १४ हजार २८५ शेतकऱ्यांनीच पिकांचा विमा उतरविला. मागील वर्षीच्या तुलनेत विमा उतरविण्याचे प्रमाण चार पटीने घसरले आहे.

नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी स्वहिस्सा भरून विमा भरल्यास त्यांना भविष्यातील संभाव्य धोक्यांपासून पिकांचे संरक्षण करता येते. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.ची नेमणूक विमा उतरवण्यासाठी केलेली आहे. जिल्ह्यातील पीक विमा उतरविण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने सुरुवातीपासूनच जागृती केली जात होती. शेतकऱ्यांना विम्याचे महत्त्व सांगितले जात होते, तरीसुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी पाठ दाखविली. पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही बरीच घट झालेली आहे, ही चिंतेची बाब आहे. 

या कारणांमुळे नुकसान झाल्यास मिळणार भरपाईपीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व रोग यामुळे उत्पादनात येणारी घट, यासाठी मदत मिळते.

हप्ता, विमा संरक्षण रक्कमधान पिकासाठी ५१ हजार २५० रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षण व त्यासाठी ५१२ रुपये ५० पैसे हप्ता निश्चित करण्यात आला आहे. सोयाबीनसाठी ३० हजार विमा संरक्षण व ७५ रुपये हप्ता तर कापूस पिकासाठी ५९ हजार रुपये विमा संरक्षण व त्यासाठी शेतकऱ्यांना १४७ रुपये ५० पैसे हप्ता निश्चित केला आहे.

खरिपासाठी २ टक्के हिस्साशेतकऱ्यांकडून खरिपासाठी २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के व नगदी पिकांना ५ टक्के हिस्सा विमा संरक्षित रकमेवर आधारावर घेतला जाणार आहे. उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन, पीक कापणी प्रयोगांवर आधारित विमा योजनेच्या प्रस्तावास २९ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. 

तालुकानिहाय विमा नोंदणीतालुका        प्राप्त अर्जअहेरी             ९३४आरमोरी         १३२१भामरागड        ६९७चामोर्शी           १०,९३८देसाईगंज        ५१८धानोरा            १६३१एटापल्ली        २७९गडचिरोली       ३०२३कोरची            ४०७कुरखेडा          १४८१मुलचेरा          १७८३सिरोंचा           १२०३

१४ हजार एक अर्ज नोंदविण्यासाठी ८०० रुपयांचा खर्च२८५ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी एकाहून अधिक ऑनलाइन अर्ज सादर केले. यात १७ हजार ९६८ अर्ज कर्जदार तर ६ हजार २७४ अर्ज बिगर कर्जदार वर्गवारीतील आहेत. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी