शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:45 IST

Gadchiroli : टप्प्या-टप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी नियोजन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जिल्ह्यातील प्रस्तावित लोह खाणी, बळजबरी भूसंपादनाविरोधात व्यापक जनसंघर्ष उभारण्याचा निर्णय २६ जूनला येथे झालेल्या प्रागतिक पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. ३० जून गडचिरोलीच्या रोजी इंदिरा गांधी चौकात यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. महेश कोपूलवार होते. शेकापचे नेते रामदास जराते यांनी जिल्ह्यातील सर्व मंजूर व प्रस्तावित लोह खाणी, प्रक्रिया प्रकल्प आणि भूसंपादन याविषयी सविस्तर  मांडणी केली. यानंतर उपस्थितांनी आपापली मते मांडून बळजबरी भूसंपादन आणि बेकायदेशीर मंजुरीविरोधात तीव्र रोष व्यक्त करत विरोध दर्शवला. पत्रके छापून प्रचार-प्रसार करणे व बाधित क्षेत्रात स्थानिक स्तरावर परिषदा घेणे, त्यानंतर व्यापक मोर्चे आंदोलन करणे असा कार्यक्रम ठरविण्यात आला.

औद्योगिक प्रकल्पांना जमिनी गेल्यास येथील नागरिकांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. आजपर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्या व्यक्तीला पुढे वर्षभर मजुरी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आत्ताच सावध होण्याचे आवाहन जराते यांनी केले.

जमीन बचाओ समिती गठितया बैठकीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष व संघटनांच्या सर्वपक्षीय प्रतिनिधींची जमीन बचाओ जनसंघर्ष समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचे निमंत्रक म्हणून शेकापचे रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड तर सदस्य म्हणून भाकपचे डॉ. महेश कोपूलवार, देवराव चवळे, माकपचे अमोल मारकवार, डॉ. धर्मराज सोरदे, समाजवादी पक्षाचे ईलियास खान, डोमाजी दिवटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रशांत मडावी, शेकापचे श्यामसुंदर उराडे, रमेश चौखंडे, ऋषी सहारे तर सल्लागार म्हणून अॅड. जगदीश मेश्राम, अॅड. सोनाली मेश्राम यांची निवड करण्यात आली.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गGadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरीfarmingशेती