शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाहून घरी परतताना अंगावर वीज कोसळली; दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चाैघांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 19:10 IST

गावकऱ्यांचे हृदय हेलावले, पाऊस आला म्हणून झाडाच्या बुंद्याखाली थांबले, पण...

पुरुषोत्तम भागडकर/ देसाईगंज: झाडाखाली बसलेल्या कुटुंबावर वीज पडून दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरवाडीतील लग्नसमारंभ आटोपून चौघे परतत होते, यावेळी अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. सोबत दोन चिमुकल्या असल्याने दुचाकी उभी करुन चौघे झाडाखाली थांबले.

यावेळी अचानक झाडावर वीज कोसळली आणि यात चौघांचाही  जागीच मृत्यू झाला. हृदय हेलावणारी ही घटना तालुक्यातील कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे आज(दि 24) सायंकाळी पावणे सहा वाजता घडली. बाली भारत राजगडे(२), देवाशी भारत राजगडे (४), अंकिता भारत राजगडे (२९) व भारत राजगडे (३५, सर्व रा. आमगाव बुट्टी ता.देसाईगंज) या चौघांचा घटनेत मृत्यू झाला. 

भारत राजगडे यांची गळगला (ता.कुरखेडा) ही सासरवाडी आहे. सासरवाडीत नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी तीन दिवसांपासून भारत राजगडे हे पत्नी व दोन मुलींसह गेले होते. २४ एप्रिलला लग्न समारंभ आटोपल्यावर ते दुचाकीवरुन कुटुंबासह परत गावी जाण्यास निघाले. कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे अचानक पाऊस सुरु झाला.

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ लागल्याने रस्त्यालगत दुचाकी उभी करुन ते झाडाच्या बुंद्याला थांबले. एवढ्यात वीज झाडावर कोसळली. यात चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब उध्दवस्थ झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आमगाव बुट्टी गावावर शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूFamilyपरिवार