लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या बाजुला असलेल्या बोअरवेल मजुरांच्या झोपडीतील सिलिंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग लागली. सदर घटना १ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.धानोरा येथील शकील पठाण यांच्या बोअरवेलच्या गाडीवर सहा मजूर काम करतात. त्यांना राहण्याकरिता पठाण यांनी आपल्या घराच्या जवळच टिनाची झोपडी उभारली होती. एक दिवसाअगोदरच सदर मजूर झोपडीत राहण्यासाठी आले होते. सायंकाळी काही मजूर बाहेर फिरायसाठी गेले होते. तर दोघे मजूर स्वयंपाक करीत होते. स्वयंपाक मांडून दोघेही झोपडीच्या बाहेर बसले होते. अचानक सिलिंडरला आग लागून त्याचा स्फोट झाला.स्फोट एवढा भयंकर होता की, टिनाचे शेड तोडून सिलिंडर कित्येक दूर अंतरावर जाऊन पडला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर ठिकाण वस्तीच्या बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. स्फोटामुळे झोपडीला आग लागून मजुरांचे कपडे, दोन मोबाईल, पाईप व इतर सामान जळून खाक झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझविली.
सिलिंडरच्या स्फोटाने झोपडीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST
धानोरा येथील शकील पठाण यांच्या बोअरवेलच्या गाडीवर सहा मजूर काम करतात. त्यांना राहण्याकरिता पठाण यांनी आपल्या घराच्या जवळच टिनाची झोपडी उभारली होती. एक दिवसाअगोदरच सदर मजूर झोपडीत राहण्यासाठी आले होते. सायंकाळी काही मजूर बाहेर फिरायसाठी गेले होते. तर दोघे मजूर स्वयंपाक करीत होते. स्वयंपाक मांडून दोघेही झोपडीच्या बाहेर बसले होते.
सिलिंडरच्या स्फोटाने झोपडीला आग
ठळक मुद्देधानोरातील घटना । स्वयंपाक करताना स्फोट