शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मलेरिया नियंत्रणासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:12 PM

जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत ४३४ रुग्ण : गेल्यावर्षीपेक्षा स्थितीत सुधारणा, भामरागडात मात्र बालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे रुग्ण कमी झाले असले तरी भामरागड तालुक्यात एक बालक दगावल्याने हा विभाग अधिक सतर्क झाला आहे.गेल्यावर्षी जानेवारी ते जून २०१७ या दरम्यान २ लाख ३९ हजार ४०९ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यापैकी १३३८ नमुन्यात मलेरिया आढळला. यावर्षी जानेवारी ते जून यादरम्यान २ लाख ३ हजार १७८ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ ४३४ जणांना मलेरिया आढळला.पावसाळ्याला सुरूवात होताच डासांची उत्पत्ती वाढते. साचलेल्या पाण्यात डास अंडी टाकतात. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. या अस्वच्छ पाण्यात डेंग्युचा डास राहात नसला तरी हिवताप किंवा जपानी ज्वराच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात डासनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. पण अनेक लोक फवारणीलाही विरोध करतात.हिवतापाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांच्या मादीमार्फत होतो. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादीमध्ये हिवताप प्रसारक अ‍ॅनोफिलीस डासाची मादी अंडे देते. त्यामुळे डासांची पैदास वाढते. डास चावल्यानंतर निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसून येतात. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना झाकण बसवावे, असे हिवताप नियंत्रण विभागाने कळविले.६६ हंगामी कर्मचाऱ्यांची भरती होणारजिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप झाल्यास पुरेसा औषधीसाठा उपलब्ध व्हावा म्हणून स्थानिक स्तरावरच औषधींची खरेदी आरोग्य प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत औषध खरेदीची निविदा प्रक्रिया झाली आहे.जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या गावांमध्ये डासनाशक फवारणी करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ६६ कर्मचाºयांच्या भरतीला मंजुरी मिळाली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले.गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील हिवतापाचे रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये प्रति दोन माणसांमिळून एक मच्छरदाणी वाटण्यात आली आहे. यावर्षी ज्या भागात मलेरियाचा प्रकोप दिसेल त्या भागात मच्छरदाण्यांचे वाटप होणार असून त्यासाठी ४१ हजार ७३२ मच्छरदाण्यात तयार आहेत.हिवतापाची लक्षणे आणि उपायथंडी वाजून ताप येणे, एक दिवसाआड ताप येणे, ताप आल्यानंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणे दिसताच कोणतेही घरगुती इलाज न करता जवळच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात घेऊन जावे.हिवतापदुषित डासांनी चावल्यानंतर १० दिवस ते चार आठवड्यात हिवतापाची लक्षणे दिसून येतात. संसर्गानंतर लवकरात लवकर सात दिवसात व उशीरात उशिरा एक वर्षापर्यंत हिवतापाची लक्षणे आढळतात. काही जंतू आपल्या यकृतामध्ये सुप्तावस्थेत राहतात. पोषक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करून आजाराची लागण होते.झोपताना हातपाय झाकले जातील अशा पायघोळ कपड्यांचा वापर करावा. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे,अधिकाऱ्यांना खटारा वाहनजिल्हा हिवताप नियंत्रण अधिकाऱ्यांना जिल्हाभर फिरण्यासाठी खटारा वाहन उपलब्ध आहे. चांगले वाहन मिळाल्यास अधिक चांगले काम होऊ शकेल असे ते सांगतात.