साळवे नर्सिंग कॉलेज चातगावचा उत्कृष्ट निकाल
By Admin | Updated: August 18, 2016 01:45 IST2016-08-18T01:45:33+5:302016-08-18T01:45:33+5:30
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबईतर्फे जीएनएम या नर्सिंग अभ्यासक्रमाचा निकाल शुक्रवार १२ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला.

साळवे नर्सिंग कॉलेज चातगावचा उत्कृष्ट निकाल
यशाची परंपरा कायम : जीएनएम निकालात जिल्ह्यातील विद्यार्थिनी चमकल्या
गडचिरोली : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबईतर्फे जीएनएम या नर्सिंग अभ्यासक्रमाचा निकाल शुक्रवार १२ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजने दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश प्राप्त केले. डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचा जीएनएम प्रथम वर्षाचा निकाल ८० टक्के, द्वितीय वर्षाचा जीएनएमचा निकाल ९३ टक्के व तृतीय वर्षाचा याच अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी पूजा व्यास हिने प्रथम, रेशमा चिपेली हिने द्वितीय तर तेजस्विनी लाकडे हिने जीएनएम प्रथम वर्षाच्या निकालात तृतीय क्रमांक पटकाविला. जीएनएम द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात श्रीदेवी बारसागडे हिने प्रथम, नीलिमा अंबादे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला असून या दोन्ही विद्यार्थिनी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. जीएनएम द्वितीय वर्षामधून अभिलाषा तागडे ही विद्यार्थिनी तृतीयस्थानी आली आहे. तृतीय वर्ष जीएनएम अभ्यासक्रमात प्रियंका कावळे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर वैशाली कुलसंगे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. दोन्ही विद्यार्थिनी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. याच अभ्यासक्रमातून मोनू उंदीरवाडे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला असून ती प्रावीण्य श्रेणीत आली आहे.
उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, कॉलेजच्या प्राचार्य पस्टम समक्का व इतर शिक्षकवृंदांनी कौतुक केले आहे. विद्यार्थिनींना संस्थाध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे यांचे नियमित मार्गदर्शन लाभले. याशिवाय डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज विविध नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमात आघाडीवर राहिले आहे.