शहरं
Join us  
Trending Stories
1
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
2
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
3
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
4
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
5
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
6
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
7
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
9
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
10
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
11
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
12
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
13
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
14
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
15
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
16
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
17
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
19
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी
20
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता

तीन हजार २८ मृद नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: March 12, 2015 01:55 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

गडचिरोली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत २५४ गावातील शेतकऱ्यांकडून तीन हजार ६७१ मृद नमूने तपासणीसाठी कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी २१९ गावातील शेतकऱ्यांचे तीन हजार २८ मृद नमुन्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. विना अनुदानित कार्यक्रमांतर्गत मृद नमूने तपासणीची टक्केवारी केवळ १८ टक्के आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे यावरून स्पष्ट होते.पीक उत्पादनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. जमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीस उपयुक्त ठरतात. मात्र अलिकडे शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्याच्या प्रयत्नात रासायनिक खताचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर आदींमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. परिणामी उत्पादनाच्या गुणधर्मामध्ये घट येत आहे. त्यामुळे शेत जमिनीची सुपिकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मृद व पाणी परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद सर्वेक्षण, मृद चाचणी अधिकारी जिल्हा कार्यालयाने मृद नमुने तपासणीसाठी २०१४-१५ या वर्षात २७८ गावांची निवड केली. यापैकी २५१ गावातील तीन हजार ५९५ सर्वसाधारण नमूने जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले. जिल्हा कार्यालयाने फेब्रुवारी अखेरपर्यंत मृद नमूने तपासणी केल्याची टक्केवारी ८४ आहे. सदर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही शेतकऱ्यांसाठी विनामूल्य असल्यामुळे या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. तरी कृषी विभागाच्या वतीने गावागावात मृद नमूने तपासणीबाबत प्रभावी जनजागृती करण्यात न आल्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत मृद नमूने तपासणीचे प्रमाण कमी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत केवळ १८ टक्केच नमूने तपासणीविनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ या वर्षात सहा हजार ७५० सर्वसाधारण, ६७५ विशेष नमूने तसेच ६७५ पाण्याचे नमूने व सूक्ष्म मूलद्रव्याचे सहा हजार ७५० एवढे जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला उद्दिष्ट होते. मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत या सर्व प्रकारच्या नमूने तपासणीची टक्केवारी केवळ १८ टक्के आहे. जिल्हा प्रयोगशाळेत या कार्यक्रमांतर्गत एक हजार २११ सर्वसाधारण नमूने तपासणी करण्यात आले. ६४ विशेष नमूने, १४७ पाणी नमूने व सूक्ष्म मूलद्रव्याचे केवळ १४० नमूने तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या एकूण १४ हजार ८५० नमूने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत एक हजार ५६२ नमुन्याची तपासणी करण्यात आली असून याची टक्केवारी १८ आहे. कृषी विभागाच्या प्रभावी जनजागृतीअभावी शुल्क भरून तपासणीसाठी नमूने देण्यास शेतकरी तयार झाले नाही. त्यामुळे मृद व पाणी नमूने तपासणीचे प्रमाण कमी आहे.