शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

माओवादग्रस्त भागात हेलिकॉप्टरने ईव्हीएम रवाना, ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

By संजय तिपाले | Updated: April 16, 2024 15:05 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील  माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली.

- संजय तिपाले गडचिरोली - पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील  माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली. ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने ईव्हीएम व इतर साहित्यासह पोहोच करण्यात आले.

राज्यातील सर्वात अतिसंवेदनशील मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूरमध्ये निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमेवरील विविध संवेदनशील व अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रांवरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह १६ रोजी सकाळी भारतीय वायूसेना आणि भारतीय लष्कराच्या ३, एम.आय. १७ आणि ४  ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले. या लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी पोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग