शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अखेर वायगाव जि.प. शाळेची इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:08 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येनापूर केंद्रातील वायगाव येथील जि.प. शाळेला जि.प. सदस्या शिल्पा रॉय यांनी महिनाभरापूर्वी भेट देऊन शाळा इमारतीची पाहणी केली होती. जीर्णावस्थेत असलेल्या या शाळा इमारतीची प्रशासनाने दुरूस्ती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली होती.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हा परिषद सदस्यांच्या निवेदनाकडे विभागाची पाठ, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येनापूर केंद्रातील वायगाव येथील जि.प. शाळेला जि.प. सदस्या शिल्पा रॉय यांनी महिनाभरापूर्वी भेट देऊन शाळा इमारतीची पाहणी केली होती. जीर्णावस्थेत असलेल्या या शाळा इमारतीची प्रशासनाने दुरूस्ती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली होती. मात्र प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले. २५ जानेवारीच्या रात्री इमारतीचे कवेलु व छत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.वायगाव जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकण्याची सुविधा आहे. या शाळेत ५८ विद्यार्थी शिक्षण घेत असून ही दोन शिक्षकी शाळा आहे. सदर शाळेची इमारत कवेलूच्या छताची आहे. पावसापासून या इमारतीचा बचाव व्हावा, यासाठी ताडपत्रीचा आधार घेण्यात आला होता. मात्र अवकाळी पावसाने सदर इमारत कोसळली. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने येथे जीवितहानी टळली. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी जि.प. सदस्य शिल्पा रॉय यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. विद्यार्थी ताडपत्रीच्या छताखाली ज्ञानाचे धडे घेत असल्याचे दिसून आले. या संदर्भात लोकमतनेही वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र सदर शाळा इमारतीच्या निर्लेखन प्रस्तावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी ही शाळा इमारत कोसळली. जिल्ह्यातील अनेक शाळा इमारतींची दुरवस्था आहे. शाळांकडून दरवर्षी शाळा कृती आराखडा, वर्गखोल्यांची संख्या आदींची माहिती विहीत नमुन्यात प्रपत्रात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाते. शाळा इमारतीच्या अवस्थेबाबत संपूर्ण माहिती असूनही जि.प.च्या शिक्षण विभागाने निर्लेखनाच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने वायगाव येथे नवीन शाळा इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी जि.प. सदस्य शिल्पा रॉय यांनी केली आहे. भेटीदरम्यान धर्मराज रॉय, विनोद गौरकार, पं.स. सदस्य वंदना गौरकार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा