शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

अखेर सिराेंचा तालुकावासीय आणि आंदोलकांपुढे झुकले तेलंगणा प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

कोरोनाकाळापासून बंद असलेले गेट नागरिकांच्या रहदारीसाठी उघडे करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत गेट उघडण्यासह इतर आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप पोरेत व इतर आंदोलकांनी दिला.लक्ष्मी डॅमवरील रहदारीसाठी ठेवलेले गेट कोरोनाकाळापासून तेलंगणा प्रशासनाने बंद केले. ते अजूनही उघडले नसल्यामुळे नागरिकांना तेलंगणात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी जात आहेत.

ठळक मुद्देमेडिगड्डाचे गेट उघडण्यासह इतर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

  लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडिगड्डा बॅरेजमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या दूर करण्यासाठी मेडिगड्डा प्रकल्पाच्या गेटसमोर शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनासमोर अखेर तेलंगणा सरकारच्या संबंधित जिल्हा प्रशासनाने नांगी टाकली. कोरोनाकाळापासून बंद असलेले गेट नागरिकांच्या रहदारीसाठी उघडे करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत गेट उघडण्यासह इतर आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप पोरेत व इतर आंदोलकांनी दिला.लक्ष्मी डॅमवरील रहदारीसाठी ठेवलेले गेट कोरोनाकाळापासून तेलंगणा प्रशासनाने बंद केले. ते अजूनही उघडले नसल्यामुळे नागरिकांना तेलंगणात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी जात आहेत. बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने बॅक वॉटर वाढून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही ती लवकर द्यावी, बॅरेजचे पाणी सोडल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली ते सोमनूरपर्यंत नदीकाठची जमीन खरडून आतापर्यंत १०० हेक्टरच्या वर जमीन पाण्यात वाहून गेली. त्याचे सर्वेक्षण करून ठरल्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी दि.१६ ला सकाळी ११ वाजतापासून मेडिगड्डाच्या गेटसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. दिवसभरात दोन वेळा तेलंगणा प्रशासनाशी चर्चा फिस्कटली. रात्री १० वाजताच्यादरम्यान महादेवपूरचे तहसीलदार यांनी  सरसकट सर्व मागण्या ३१ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. ३१ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेडी संदीप पोरेत यांच्यासह अमित बेझलवार, चंद्रशेखर पुलगम, सांबाजी सोमनपल्ली,  देवेंद्र रंगू भास्कर गुडीमेटला, लंगारी कलाक्षपवर, अनिकेत ओंडरे,  समय्या ओलाला, रमेश गट्टू, नर्सिंग सिल्व्हेरी, संपत अण्णा यांच्यासह अंकीसा व आसरअल्ली येथील नागरिक उपस्थित होते.

बंद पाळून नागरिकांनी दिला पाठींबाआंदोलनदरम्यान अंकीसा व आसरली येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दर्शवला. तसेच काळी-पिवळी वाहन संघटना, ऑटो चालक-मालक संघटना यांनीही आपल्या गाड्या बंद ठेवून या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

दुर्लक्ष केल्यामुळे उपसले आंदोलनाचे हत्यारसदर ठिय्या आंदोलनापूर्वी तहसीलदारांमार्फत गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर खासदार अशोक नेते यांच्या समक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तेलंगणा राज्यातील जयशंकर भोपालपल्ली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र तेलंगाणा प्रशासनाने या गंभीर  विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

 

टॅग्स :agitationआंदोलनTelanganaतेलंगणा