लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आत्मसमर्पित नक्षल युवक-युवती स्वावलंबी बनावे, या उद्देशाने गडचिराेली पाेलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने १६ फेब्रुवारी राेजी नवेगाव येथे राेजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयाेजन केले. या मेळाव्याला ३२० आत्मसमर्पित नक्षल युवक-युवती उपस्थित हाेते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख उपस्थित हाेते. यावेळी घरकुल प्रमाणपत्र व ८१ जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. मार्गदर्शन करताना पाेलीस अधीक्षक गाेयल म्हणाले, आत्मसमर्पण केल्यास शासन काेणतीही मदत करीत नाही, अशी चुकीची माहिती नक्षलवादी चळवळीतील व्यक्तींना देतात. मात्र हे खाेटे असून पाेलीस दल शासन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या नेहमी पाठीशी राहते. त्यांच्या आवडीनुसार राेजगार दिला जाईल, भूखंडावर जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी लाईट व पाण्याची व्यवस्थाही करून दिली जाईल. दर महिन्याला विकासकामांचा आढावा घेतला जाईल, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान जि. प.चे मुख्य कार्यकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी येरेकर यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी आत्मपसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी गंगाधर ढगे आदींनी सहकार्य केले.
आत्मसमर्पित नक्षल्यांना देणार राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST
मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख उपस्थित हाेते. यावेळी घरकुल प्रमाणपत्र व ८१ जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
आत्मसमर्पित नक्षल्यांना देणार राेजगार
ठळक मुद्देपाेलीस विभागाचा उपक्रम; मेळाव्यात पाेलीस अधीक्षकांचे प्रतिपादन