लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : सिरोंचा तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली येथे अवैैधरीत्या दारू काढून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस व दारूबंदी संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोहफूल व गुळाचा सडवा शनिवारी सकाळी नष्ट केला.बोरमपल्ली येथील इंदिरा महिला बचत गटाच्या महिलांनी शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले व पोलीस कर्मचाºयांसह दारूविक्रेत्यांच्या घरांवर धाड टाकली. या धाडीत घटनास्थळी दारू काढण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल म्हणजेच साठवून ठेवलेला गुळ व मोहाचा सडवा आढळून आला. महिलांनी सदर सडवा जागीच नष्ट केला. तसेच अन्य दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दारू पकडून कारवाई केली. यावेळी इंदिरा महिला बचत गटाच्या महिला अध्यक्ष इंदिरा कोरते, सदस्य श्वेता कोडापे, व्यंकटम्मा नैैताम, मंजूळा कोडापे, यशोदा सडमेक तसेच बचत गटाच्या १५ ते २० महिला उपस्थित होत्या.महिला बचत गटाच्या पुढाकाराने केलेल्या कारवाईमुळे गावातील दारूविक्रेत्यांवर वचक बसला असून परिसरातील नागरिकांकडून बचत गटाच्या महिलांचे कौतुक केले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने प्रत्येक गावातील नागरिकांनी बचत गटाच्या महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन उपपोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून बोरमपल्ली येथे अवैैध दारूविक्री वाढली होती. परंतु आता महिलांच्या पुढाकारामुळे धडक कारवाई केली जात आहे.
मोहफूल व गुळाचा सडवा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:44 IST
सिरोंचा तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली येथे अवैैधरीत्या दारू काढून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस व दारूबंदी संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोहफूल व गुळाचा सडवा शनिवारी सकाळी नष्ट केला.
मोहफूल व गुळाचा सडवा केला नष्ट
ठळक मुद्देबामणी येथे कारवाई : पोलीस व दारूबंदी महिला संघटनेची अड्ड्यांवर धाड