शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत साहित्य संमेलनातून आदिवासी महिलांचा एल्गार

By संजय तिपाले | Updated: April 15, 2023 18:17 IST

ग्रंथदिंडीने सुरुवात : पारंपरिक रेला नृत्याने वेधले लक्ष

गडचिरोली : आदिवासींच्या पहिल्या महिलासाहित्य संमेलनास १५ एप्रिल रोजी सुरुवात करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांसह शालेय विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले.

संमेलनाच्या मंचाला ज्येष्ठ समाजसेविका जंगोरायताड यांचे नाव दिले आहे. ज्येष्ठ साहित्यिका नजूबाई गावित यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मेघालयच्या प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार अध्यक्षस्थानी होत्या, तर माजी आमदार हिरामण वरखडे स्वागताध्यक्ष होते. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. सतीश गोगुलवार, अशोक चौधरी, नंदा भील, रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम, साहित्यिका कुसूम आलाम, केशवशहा आत्राम, अशोक श्रीमाली यांची उपस्थिती होती. साहित्य संमेलनातून १३ राज्यांतील साहित्यिकांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासी महिलांचे पहिले साहित्य संमेलन होत आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे सांगितले. आदिवासी साहित्यातून दुर्गम भागातील महिलांच्या वेदनांना वाचा फुटायला हवी. आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे संमेलन असून, यातून आदिवासींचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त केला.

काळाची चाहूल ओळखा

आपलं संपूर्ण आयुष्य दुर्गम, अतिदुर्गम भागातील घनदाट जंगलात व्यतीत करणारे आदिवासी हेच जंगलाचे खरे हक्कदार आहेत. त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव पध्दतशीरपणे आखला जात आहे. लोहखाणींमध्ये बेसुमार उत्खनन सुरू आहे, प्रदूषण वाढत आहे, निसर्गाचे सौंदर्य हिरावले जात आहे. आदिवासींना, ग्रामसभांना न विचारता हे अतिक्रमण सुरू असल्याची खंत साहित्यिका कुसूम आलाम यांनी व्यक्त केली. काळाची चाहूल  ओळखून आदिवासींनी प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :literatureसाहित्यWomenमहिलाGadchiroliगडचिरोलीSocialसामाजिक