शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अडीच लाख रुपयांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:44 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या.

ठळक मुद्दे२६ हजार युनिटची चोरी : दीड महिन्यात २१ वीज चोरट्यांना पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. सदर चोरट्यांनी २ लाख ५५ हजार रुपयांच्या तब्बल २६ हजार ७४९ युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. या वीज चोरट्यांविरोधात वीज कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली.मार्च, एप्रिल, मे या महिन्यात विजेचा वापर जास्त असतो. त्यामुळे वीज बिल कमी करण्याच्या लालसेपायी वीज चोर वीज चोरीकडे वळतात. परंतु अशाही स्थितीत महावितरणची करडी नजर चोरट्यांवर असते. वीज मीटरमध्ये छेडछाड करून चोरी करण्याचे प्रकार महावितरणच्या मोहिमेत उघडकीस आले आहे. वीज मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे, सर्किटमध्ये फेरफार करणे आदी प्रकारातून वीज चोरी केली जाते.अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यानंतर माणसाला शिक्षणाचीही गरज आहे. अशाच प्रकारे सध्याच्या आधुनिक युगात वीज पुरवठा ही महत्त्वपूर्ण गरज झाली आहे. विजेवर विविध उपकरणे चालविता येतात. शिवाय विविध प्रकारच्या व्यवसायासाठीही वीज पुरवठा आवश्यक असतो. महावितरणच्या वतीने घरगुती व व्यावसायिक अशा दोन प्रकारची वीज जोडणी दिल्या जाते. वीज पुरवठ्याची गरज असलेल्या नागरिकांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर महत्त्वपूर्ण दस्तावेजासह रितसर अर्ज सादर करून महावितरणकडून वीज जोडणी घ्यावी, वीज मीटर उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन केले जाते. अनेक नागरिक रितसर वीज जोडणी घेतात. मात्र काही नागरिक आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून लगतच्या घरून स्वत: राहत असलेल्या घरी किंवा आपल्या दुकानामध्ये वीज पुरवठा घेतात.एप्रिल ते मे २०१९ या कालावधीत गडचिरोली विभागात ९ वीज चोरट्यांनी ६२ हजार रुपये किमतीच्या ९ हजार वीज युनिटची तर आलापल्ली विभागात १२ वीज चोरट्यांनी १ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या १७ हजार ७४९ इतक्या वीज युनिटची चोरी केल्याचे मोहिमेत उघड झाले आहे. या चोरट्यांवर वीज कायदा २००३ चे कलम १३५ व १३८ अन्वये महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.वर्षभरात आढळले १८९ वीजचोरमहावितरणच्या वतीने दरवर्षीच्या उन्हाळ्यात वीज चोरट्यांविरूद्ध मोहीम राबविली जाते. तसेच महावितरणची ही मोहीम वर्षभर सुरू असते. एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात आलापल्ली व गडचिरोली हे दोन विभाग मिळून एकूण १८९ चोरट्यांची वीज चोरी पकडण्यात आली. यात चोरट्यांनी २६ लाख ४३ हजार रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी झाल्याचे आढळून आले. आलापल्ली विभागात ४८ वीज चोरट्यांनी ५ लाख ८० हजार तर गडचिरोली विभागात १४१ वीज चोरट्यांनी २० लाख ६३ हजार रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी केली आहे.