शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

विभागीय आयुक्तांच्या २२ नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची आणि चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १ डिसेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होणार असून २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, सर्व नगरपंचायतींची अंतिम प्रभागरचना आणि आरक्षणही बुधवारी निश्चित करण्यात आले. विभागीय आयुक्तांच्या २२ नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची आणि चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अहेरी

अहेरी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १७, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग १३, अनुसूचित जमातीकरिता २ व ७, तर  अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ४, ९ आणि १६, नामाप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग) करिता प्रभाग १४, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १, ३, ५ आणि ८ तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक ६, १०, ११, १२ आणि १५ राखीव राहणार आहेत. 

सिराेंचा

सिरोंचा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ४, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ८ व १७, अनुसूचित जमातीकरिता २, तर  अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ७, नामाप्रकरिता प्रभाग ११, नामाप्र (स्त्री) करिता प्रभाग ३, १२, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग १, ५, ६, व १० आणि सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग ९, १३, १५ आणि १६ राखीव राहतील. 

एटापल्ली

एटापल्ली नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग १०, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ३, अनुसूचित जमातीकरिता ६, ९, १२ आणि १३ तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ४, ७, ११ आणि १४, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, १५ आणि १६ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ५, ८ आणि १७ जाहीर करण्यात आले आहेत.

भामरागड

भामरागड नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ४, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग २, ३, ५, ६ आणि ११, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग १, ८, ९, १०, १४ आणि १६, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक ७, १३  आणि १७, तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १२ आणि १५ जाहीर करण्यात आले आहेत.

चामाेर्शी

चामोर्शी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग ४, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ६, अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक १३, नामाप्रकरिता प्रभाग ८ व १०, नामाप्र (स्त्री) करिता प्रभाग ३ व ११, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, ७, ९, १२ आणि १६ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ५, १४, १५ व १७ जाहीर करण्यात आले आहेत.

मुलचेरा

मुलचेरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग १५, अनुसूचित जाती (स्त्री) करिता  प्रभाग ५, अनुसूचित जमातीकरिता १, ७, १० आणि १४, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ९, ११, १३, १६ आणि १७, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, ४, आणि १२ तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक ३, ६, आणि ८ जाहीर करण्यात आले आहेत.

धानाेरा

धानोरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १७, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग १, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग ६ आणि १० तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ४, १२ आणि १४, नामाप्रकरिता प्रभाग ५, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग ९, ११, १५ आणि १६ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता २, ३, ७, ८ आणि १३ हे प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत.

कुरखेडा

कुरखेडा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १४, अनुसूचित जाती (स्त्री)करिता प्रभाग ४ आणि १३, अनुसूचित जमातीकरिता प्रभाग ९, अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग ११ आणि १६, नामाप्रकरिता प्रभाग १७, नामाप्र (स्त्री) करिता प्रभाग ८, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग २, ३, ६, १२ आणि १५ तसेच सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ५, ७ आणि १० जाहीर करण्यात आले आहेत.

काेरची

कोरची नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग १२, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग ३ व ११ अनुसूचित जमातीकरिता प्रभाग ९, १३ आणि १५, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करिता प्रभाग २, ६, ८ आणि १७, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग ५, १०, १४ व १६, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग १, ४, ७ जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी कळविले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक