लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्रवासी वाहन उलटून चालकासह आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना वैरागड-आरमोरी मार्गावर वैरागडपासून दोन किमी अंतरावर शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.जयश्री बडवाईक (३४), विद्या नारनवरे (२०) रा. वैरागड, निर्मला दुमाने (५५), जीवन नंदरधने, वैशाली कामतकर रा. इंजेवारी, सुरेखा चुधरी रा. कनेरी, विमल गेडाम रा. पळसगाव व वाहनचालक प्रवीण हडप रा. वैरागड, अशी जखमींची नावे आहेत. एमएच-३३-९७६४ क्रमांकाचे भंगार वाहन जवळपास २० प्रवाशी घेऊन वैरागडकडे येत होते.वैरागडपासून दोन किमी अंतरावर प्रवासी वाहनाचे समोरचे टायर फुटले. त्यामुळे सदर वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटले. यामध्ये वाहनचालकासह आठ प्रवासी जखमी झाले. जयश्री बडवाईक यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. इतर जखमी आरमोरीत भरती आहेत.
प्रवासी वाहन उलटून आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:13 IST
प्रवासी वाहन उलटून चालकासह आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना वैरागड-आरमोरी मार्गावर वैरागडपासून दोन किमी अंतरावर शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
प्रवासी वाहन उलटून आठ जखमी
ठळक मुद्देवैरागडजवळ अपघात : वाहनाचे टायर फुटल्याने घडली घटना