शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पावसाअभावी शेतजमिनीला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट झाले गडद : विदारक दृश्य पाहून पाणावताहेत शेतकऱ्यांचे डोळे

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/चामोर्शी : जुलै महिन्यात देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. जोरदार पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडत असून रोवणी झालेले शेतजमिनीला भेगा पडत आहेत. हे विदारक दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच्या शेतीवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचे बजेट यावर्षी कोलमडले आहे. पीक कर्ज व खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पीक लागवडीचा आतापर्यंतचा खर्च बºयाच शेतकºयांनी केला आहे. या दोन्ही तालुक्यात धानपीक रोवणीचे काम ४० टक्क्याच्या आत आहे. रोवणी झालेल्या शेताला सुद्धा पाणी नसल्याने हे पीक धोक्यात आले आहे. शेतातील बांध्या पूर्णत: कोरड्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतजमिनीला भेगा पडत आहे. छोटी-मोठी सिंचन सुविधा असलेले शेतकरी मोटारपंप व विहिरीच्या माध्यमातून शेताला पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र पावसाळ्याच्या सुरूवातीपासूूनच कृत्रिम पाणीपुरवठा करावा लागत असल्याने यावरील विद्युत बिल व इंधनाचा खर्च शेतकºयांच्या माथी पडणार आहे. परिणामी यावर्षीची धानाची शेती पूर्ण तोट्याची होणार आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी नहरामार्फत शेतजमिनीला सोडण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातही रेगडी येथील कन्नमवार धरणाचे पाणी नहराद्वारे सोडण्यात आले आहे.रोवणीसाठी सोडले रेगडी धरणाचे पाणीपाऊस बरसत नसल्याने चामोर्शी तालुक्यातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहे. दरम्यान ही बाब बºयाच शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आमदारांनी रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी नहरामार्फत सोडण्यासंदर्भात शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर १ जुलै रोजी आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत जलपूजन करून दिना धरणाचे पाणी सोडण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे उपस्थित होते. दिना धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने काही शेतकऱ्याचे रोवणीचे काम सुरू झाले आहे. मात्र उपकालव्याला पाणी न सोडल्याने चामोर्शीलगतच्या शेतातील रोवणीचे काम अजूनही ठप्प पडले आहे. उपकालव्याला पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी