शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी

By admin | Updated: June 26, 2014 23:13 IST

करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे.

गडचिरोली : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे. त्यातूनच खासगी शिकवण्यांनाही गर्दी वाढत असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणातून दिसून येते. मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असल्यानेच शिकवणी लावल्याचे अनेक पालकांनी म्हटले आहे. तसेच, ‘केजी’पासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जात असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आले.आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, यासाठी त्याला जास्तीत-जास्त पुरक शिक्षण दिले जाते. मग या पुरक शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जेतात. योग्य शाळा लावणे, घरी वेळच्या-वेळी अभ्यास घेणे, त्याचबरोबर पाल्यास योग्य शिकवणी लावणे याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे केजीपासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जाते. मुले इंग्रजी माध्मयात शिकत असल्याने शिकवणी लावत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार केजी ते इयत्ता चौथीपर्यंत शिकवणी लावण्याचे हे प्रमाण ३४ टक्के आहे. साधारणत: एवढेच म्हणजे ३७ टक्के आठवी ते दहावीतील मुले शिकवणीला जातात. इंग्रजी माध्यमामुळे शिकवणी लावली असल्याचे तब्बल ७२ टक्के पालकांनी सांगितले आहे. बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांना शिकवणी लावणे गरजचे झाले आहे. पुढच्या वर्गात जाण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही वाढत जातो. आठवी व नववी हा दहावीचा पाया मानला जातो म्हणून शिकवणीची गरज पडते. पण, ज्युनियर-सिनियर के .जी. पासूनच मुलांनाही शिकवणी लावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)