लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहराच्या नैनपूर वॉर्डातील रहिवासी आकाश ईश्वर घोरमोडे यांच्या गावालगतच्या शेतातील धानपुंजण्याला आग लागल्याने धानाचे पुंजणे जळून खाक झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.या घटनेमुळे शेतकरी आकाश घोरमोडे यांचे जवळपास सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. घोरमोडे यांनी आपल्या शेतात धानाची कापणी करून काही दिवसांपूर्वीच पुंजने तयार करून ठेवले होते. दरम्यान २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास धान पुंजण्याला आग लागली. यात संपूर्ण धान पुंजणे जळून खाक झाले. आरपीएन प्रजातीच्या धानाचे एकूण ८० पोते धान मळणीनंतर होणार असा अंदाज शेतकरी घोरमोडे यांचा होता. जवळपास ७० क्विंटल धानाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी तागडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी चैतनदास विधाते, राधेश्याम मैंद, चेतन घोरमोडे, सुनील फुंड आदी शेतकरी हजर होते. पुंजण्याला आग कशी लागली हे कळू शकले नाही.
धान पुंजणे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:07 IST
शहराच्या नैनपूर वॉर्डातील रहिवासी आकाश ईश्वर घोरमोडे यांच्या गावालगतच्या शेतातील धानपुंजण्याला आग लागल्याने धानाचे पुंजणे जळून खाक झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
धान पुंजणे जळून खाक
ठळक मुद्देसव्वा लाखांचे नुकसान : शेतकऱ्यावर ओढवले संकट