शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीपायी पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडून देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 08:23 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, आतापर्यंत असा कोणताही रिपोर्ट नाही, की ज्यात पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो असे म्हटले आहे.

ठळक मुद्देडॉ. प्रकाश आमटे यांचे कळकळीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आदिवासी क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून सेवाकार्य देत असलेले डॉ. प्रकाश आमटे यांचा एक संदेश व्हायरल होत आहे. यात त्यांनी पाळीव प्राण्यांविषयीची काळजी व्यक्त केली आहे. ते यात म्हणतात, कोरोना हे जगावरचे मोठे संकट आहे. या संकटाला आपण सर्वजण धीराने तोंड देत आहोत. मात्र काही ठिकाणी असे आढळले आहे की, भीतीपोटी काही ठिकाणी नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना दूर नेऊन सोडत आहेत. हे पाहून मला अतिशय दु:ख झाले. आपण जाणताच मी पशुप्रेमी व पर्यावरणवादी आहे. आमच्याकडे गेल्या ४५ वर्षांपासून पाळीवर प्राण्यांसोबतच जंगली प्राणीही वास्तव्याला असतात.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, आतापर्यंत असा कोणताही रिपोर्ट नाही, की ज्यात पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांनाही घरात राहू द्या. त्यांना बाहेर नेऊन सोडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस