शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'तरूणांनो, नक्षलवादी बनू नका'; ठार झालेल्या नक्षली कमांडरच्या काकांचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 8:42 PM

रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर साईनाथ ठार झाला

गडचिरोली : साईनाथ नक्षलवादी चळवळीत सामील झाला. मात्र त्यामुळे त्याच्या कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली. त्यामुळे तरुणांनो, नक्षलवादी बनू नका, असं आवाहन साईनाथच्या काकांनी केलं. साईनाथ ऊर्फ डोलेश मादी आत्राम हा नक्षलवाद्यांचा डीव्हीसी कमांडर रविवारी झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या काकांच्या ताब्यात देण्यात आला. 'साईनाथ नक्षली चळवळीत सहभागी झाल्याच्या चिंतेत त्याच्या वडिलांनी मृत्यूला कवटाळलं. त्यानंतर त्याची आई निराधार झाली. तिचं संपूर्ण आयुष्य साईनाथच्या आठवणीत गेलं. साईनाथ नक्षली चळवळीत सहभागी झाल्यानं त्याच्या कुटुंबाची पूर्णपणे वाताहत झाली. नक्षली चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याच्या कुटुंबाची जवळपास अशीच स्थिती असून तरूणांनी नक्षल चळवळीमध्ये सहभागी होऊ नये,' असं कळकळीचं आवाहन साईनाथचे काका डुंगा आत्राम व बिरसू आत्राम यांनी केलं.भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगल परिसरात २२ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत डीव्हीसी कमांडर साईनाथ मारला गेला. त्याची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह सुपूर्द करण्यासाठी त्याच्या दोन्ही काकांना पोलिसांनी गडचिरोलीत बोलवलं. साईनाथचा मृतदेह बघून दोन्ही काकांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी त्यांनी साईनाथची हकीकत सांगितली. 'साईनाथ जवळपास १५ वर्षांचा असताना नक्षलवादी गावात आले. त्यांनी साईनाथला फुस लावून पळवून नेलं. नक्षलवाद्यांच्या शस्त्रांपुढे साईनाथचे आईवडील काहीच करू शकले नाहीत. साईनाथच्या चिंतेमुळे अगदी दोन वर्षातच वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर आई पूर्णत: निराधार झाली,' असं साईनाथच्या काकांनी सांगितलं. साईनाथनं केलेली चूक इतर तरुणांनी करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली