शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'दोन पैशांची दारू पिऊन अमूल्य मत पाच वर्षे दावणीला बांधू नका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:36 IST

मुक्तिपथ- शक्ती पथतर्फे जागृती : गावागावांत लागले फलक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेली निवडणूक ही दारूमुक्त व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मुक्तिपथ-शक्तिपथ संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाभरात शहरी, तसेच ग्रामीण भागात बॅनर व पत्रकांच्या माध्यमातून ही विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन केले जात आहे.

मागील ३१ वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदी आहे. ही दारूबंदी कायमस्वरूपी टिकून आहे. 'जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू', 'दोन पैशांची दारू घेऊन आपले अमूल्य मत देऊ नका', 'ज्याला दारूबंदी नको, तो उमेदवार आम्हाला नको', असा आशय लिहिलेल्या बॅनरद्वारे मतदार जागृती करून ही निवडणूक दारूमुक्त करण्याबाबत लोकांना आवाहन केले जात आहे. 

तसेच निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने आम्हाला द्यावे लागेल. वचन न देणाऱ्या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. स्वतः दारू पिणारा नसावा, असे सांगितले जात आहे. 

१५,२२३ लोकांचा स्वाक्षरी मोहिमेत सहभाग निवडणुकीत उमेदवारांकडून दारूचे वाटप होऊ नये यासाठी मुक्तिपथ- शक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावागावांमध्ये ठराव घेऊन आपला उमेदवार कसा असावा, मतदारांचे कर्तव्य आदी बाबी पटवून दिल्या जात आहेत. जिल्हाभरातून २७२ गावांमध्ये ठराव पारित करण्यात आले असून, एकूण १५ हजार २२३ लोकांनी स्वाक्षरी करीत दारूमुक्त निवडणूक पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध ठिकाणी बॅनर लावून जागृती सुरु आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोली