शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

पऱ्हे करपताहेत; शेतकरी मेटाकुटीस

By admin | Updated: July 16, 2015 02:09 IST

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली.

गडचिरोली : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर १५ ते २० दिवस पावसाने दडी मारली. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवस हलकासा पाऊस बरसला. आता निसर्गाने डोळे वटारले असून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकलेले धानाचे पऱ्हे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचन सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या साहाय्याने कसेबसे पऱ्हे वाचविले. मात्र पाण्याचे स्त्रोतही कोरडे झाल्याचे रोवणीलायक पऱ्हे होऊनही दमदार पावसाअभावी जिल्हाभरातील रोवणीचे काम खोळंबले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.धान बियाणे उगवलेच नाही : आरमोरी शहरालगतच्या शेतात काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. तसेच काही शेतकऱ्यांनी धान पिकाच्या आवत्याची पेरणी केली. मात्र पावसाने दोन आठवड्यापासून उसंत घेतल्यामुळे या भागातील शेतजमिनीतून धान बियाण्यांचे अंकूर अत्यल्प प्रमाणात उगवले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हे व आवत्या पावसाअभावी उगवलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर पऱ्हे व आवत्याची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.देसाईगंज तालुक्यातील विसोरा भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानाची पेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी धानाच्या पऱ्ह्याची वाढ खुंटली असल्याने विहित वेळेत रोवणीचे काम होणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.१५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी तसेच रोवणीसाठी देसाईगंज तालुक्यातील विसोरा भागातील शेतकरी मोटारपंपाच्या सहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून वीज पुरवठ्याचे अघोषित भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोटारपंपही निकामी झाले आहेत. मोटारपंप असूनही शेतकरी ऐनवेळी पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.