शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या बारदान्याचे पैसे देता की बारदाणे परत करता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 23:13 IST

शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बारदाना विकत घ्यावा लागत आहे. खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो शेतातून हाती पडलेले पीक पोत्यांमध्ये टाकून शेतकरी आधारभूत हमीभाव केंद्रांवर नेतात. आविका संस्थेसह मार्केटींग फेडरेशन अंतर्गत  केंद्रांवर बऱ्याचदा बारदान्याचा तुटवडा दिसून येतो. अशावेळी प्रतीक्षा करत बसण्याऐवजी अनेक शेतकरी  स्वत:कडील बारदाना वापरतात.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटींग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर अनेकवेळा बारदान्याचा तुटवडा निर्माण होतो. अनेक शेतकरी स्वत:कडील बारदाना केंद्राला देतात; परंतु शेतकऱ्यांना ना बारदाना परत मिळतो ना त्याचे पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बारदाना विकत घ्यावा लागत आहे.खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो शेतातून हाती पडलेले पीक पोत्यांमध्ये टाकून शेतकरी आधारभूत हमीभाव केंद्रांवर नेतात. आविका संस्थेसह मार्केटींग फेडरेशन अंतर्गत  केंद्रांवर बऱ्याचदा बारदान्याचा तुटवडा दिसून येतो. अशावेळी प्रतीक्षा करत बसण्याऐवजी अनेक शेतकरी  स्वत:कडील बारदाना वापरतात.

८७ आधारभूत धान खरेदी केंद्रआदिवासी विकास महामंडळ व मार्केटींग फेडरेशनचे मिळून गडचिराेली जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास ८७ केंद्रे सुरू करण्यात आली होती. यामध्ये महामंडळाचे केंद्रे अधिक हाेते.

मागील वर्षीचे बारदान्याचे पैसे कधी मिळणार?- अनेक शेतकऱ्यांचा बारदाना आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे राहतो. केंद्र चालकांकडून अनेकांना पैसे किंवा बारदाना परत देण्याची हमी देतात; परंतु ती केवळ हमीच राहते. अनेकवेळा नवीन बारदाना घ्यावा लागताे. काही शेतकऱ्यांना मागील वर्षीचे बारदान्याचे पैसे अजुनही मिळाले नसल्याची माहिती आहे.

शेतकरी म्हणतात....

मी गेल्या अनेक वर्षांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीसाठी नेतो. अनेकवेळा बारदाना नसल्याने धान विक्री प्रभावित हाेते. अशावेळी बारदाना केंद्रांना दिला जातो; परंतु तो परत मिळत नाही.        -  परशुराम काटेंगे, शेतकरी.

महामंडळाच्या केंद्रावर हमी भाव मिळताे. त्यामुळे आम्ही दरवर्षी महामंळाच्याच केंद्रांवर विकीसाठी धानाची पाेती नेताे. मात्र काहीवेळा तिथे बारदाना उपलब्ध हाेत नसल्याने आम्हाला आमच्याकडील बारदना वापरावा लागताे.             - विनायक चुधरी, शेतकरी.

तीन वर्षापुर्वी तुटवडा

महामंडळ आणि मार्केटींग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची माेठया प्रमाणात धानाची खरेदी करण्यात येते. तीन वर्षापुर्वी बारदान्याचा तुटवडा दाेनदा निर्माण झाला हाेता. गतवर्षी बारदाना पुरेशा प्रमाणात उपलब्ध हाेता, अशी माहीती मिळाली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड