मतभेद आणि मनभेद दूर करणारा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:39 PM2019-01-14T22:39:31+5:302019-01-14T22:41:07+5:30

तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.

Disturbing festival | मतभेद आणि मनभेद दूर करणारा सण

मतभेद आणि मनभेद दूर करणारा सण

Next
ठळक मुद्देतिळाच्या गोडव्यातून गैरसमज हद्दपार करायोगिता पिपरे नगराध्यक्ष, गडचिरोली

तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.
पूर्वी संक्रांतीला तीळगुळ घरोघरी नेऊन वाटले जायचे. आज वॉर्डावॉर्डात महिलांचे मेळावे घेऊन त्यांना एकत्रित केले जाते. या निमित्ताने महिलांची चर्चा होते. त्यांची मनं जुळतात. विशेष म्हणजे अनेक वेळा कोणतेही ठोस कारण नसताना केवळ गैरसमजातून अबोला किंवा राग केला जातो. ही गोष्ट सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नासवणारी आहे. पण या सणाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या महिला मनातील मळभ दूर करून सकारात्मकतेची नवीन सुरूवातच करतात. त्यामुळेच हा सण महिलांवर्गात प्रिय असतो.
तीळगुळाच्या गोडव्यातून गोड बोलण्याचा संदेश देणाऱ्या या सणाचे महत्व त्यामुळेच मोठे आहे. आपण ही संस्कृती जपली पाहिजे. यासोबतच नवीन वर्षातील या पहिल्या सणाच्या निमित्ताने आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, चांगली पुस्तके वाचणे असे काही संकल्पही महिलांनी करावे.
युवा पिढी मोबाईलच्या नादात बिघडत आहे. केवळ मनोरंजनात्मक गोष्टीत अडकून न पडता मनाला शांती देणाºया चार गोष्टी केल्यास कधीही मन अस्वस्थ होत नाही. तीळ संक्रांतीच्या निमित्ताने याचाही संकल्प आपण करूया.

Web Title: Disturbing festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.