अल्प पीककर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:34+5:30

जिल्हाधिकारी शेखर सिंह व आ.डॉ.देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरबीआय, एलडीएम, डीडीएम, पोस्टल बँक, डीडीआर, जिल्हा समन्वयक व इतर सरकारी विभागांची बैठक रविवारी आयोजित केली होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज व सीडी गुणोत्तर क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला. काही बँकांनी अत्यंत कमी प्रमाणात कर्ज वितरण केले असल्याचे दिसून आले.

District Collectors Concerned Over Distribution Of Small Crops | अल्प पीककर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

अल्प पीककर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात कर्जाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वितरण करावे, यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. तरीही काही बँकांनी उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात कर्ज वितरण केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह व आ.डॉ.देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरबीआय, एलडीएम, डीडीएम, पोस्टल बँक, डीडीआर, जिल्हा समन्वयक व इतर सरकारी विभागांची बैठक रविवारी आयोजित केली होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज व सीडी गुणोत्तर क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला. काही बँकांनी अत्यंत कमी प्रमाणात कर्ज वितरण केले असल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना कर्ज उपलब्ध होईल, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. के.सी.सी. मर्यादा गाढताना पशुपालन, मत्स्यपालन, कुकुटपालन आदी घटकांना कर्ज वितरण करावे. उद्दिष्ट साध्य न होण्यासाठी कोणत्या मर्यादा आल्या, याची नोंद घ्यावी, असे निर्देश दिले.

Web Title: District Collectors Concerned Over Distribution Of Small Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.