कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून संयोजक डॉ. गोपाल तोमर, समन्वयक डॉ. अपर्णा मारगोणवार , डॉ. पी. के. सिंग उपस्थित होते. प्राचार्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी २५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव मोठे करावे. व पुढील वाटचाल करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा .डॉ. प्रकाश राठोड यांनी तर आभार प्रा. डॉ पी. के. सिंग यांनी मानले. याप्रसंगी प्रा.डॉ. रमेश सोनटक्के , प्रा. डॉ. प्रदीप कश्यप ,प्रा. सुबोध साखरे , प्रा.रमेश शिल्लमवार ,राकेश बोनगीरवार , शुभांगी डोंगरे , विजय खोब्रागडे , अविनाश जिवतोडे ,देविदास किवे , रमेश वागदरकर आदी उपस्थित होते.
आष्टीत प्रमाणपत्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST