राष्ट्रीय लाेकअदालतीत ९४ खटल्यांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:41+5:30

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  एस. सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधिश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश  आर.एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश एम.आर. वाशिमकर यांनी पॅनल क्रमांक २ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.

Disposal of 94 cases in National Lok Sabha | राष्ट्रीय लाेकअदालतीत ९४ खटल्यांचा निपटारा

राष्ट्रीय लाेकअदालतीत ९४ खटल्यांचा निपटारा

Next
ठळक मुद्देन्यायालयांत आयाेजन : १ काेटी १४ लाखांचा दंड वसूल; विविध प्रकरणांचा समावेश

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १२  डिसेंबर रोजी शनिवारला जिल्ह्यात ठिकठिकाणच्या न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच तब्बल १ कोटी १४ लाख ३९६ रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  एस. सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधिश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश  आर.एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश एम.आर. वाशिमकर यांनी पॅनल क्रमांक २ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी पॅनल क्रमांक ३ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. पॅनल क्रमांक १ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड. एस .एल. जनबंधु  आणि विधी स्वयंसेवक अकील शेख  यांनी काम केले. तसेच पॅनल क्रमांक २ मध्ये  अ‍ॅड. सोनाली मेश्राम तसेच विधी स्वयंसेविका वर्षा मनवर  आणि पॅनल क्रमांक ३ मध्ये अ‍ॅड. अमित ए. तागडे  व सामाजिक कार्यकर्ते  दिनेश बोरकुटे यांनी काम केले.
लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता गडचिरोली जिल्हा वकिल संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Disposal of 94 cases in National Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.