शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

तुला व्हिडीओ काढता येतो, मला पण शिकवं! पोलिस महासंचालकांची आदिवासी मुलीला दाद 

By संजय तिपाले | Published: February 17, 2024 6:48 PM

महासंचालक शुक्ला यांच्या साधेपणाने उपस्थित आदिवासी बांधव देखील भारावून गेले.

गडचिरोली: 'अरे व्वा... तुला व्हिडिओ काढता येतो... मला पण शिकवं...' अशा शब्दांत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आदिवासी चिमुकलीला दाद दिली. यावेळी तिच्या जवळ जाऊन हितगुज साधण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. महासंचालक शुक्ला यांच्या साधेपणाने उपस्थित आदिवासी बांधव देखील भारावून गेले. अतिदुर्गम गर्देवाडा (ता.एटापल्ली) या नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यातील पोलिस मदत केंद्राला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी १७ फेब्रुवारीला भेट दिली. हेलिकॉप्टरमधून एंट्री झाल्यानंतर जनजागरण मेळाव्यात पोहोचताच रश्मी शुक्ला यांनी उपस्थितांना ' कसे आहात तुम्ही सगळे...?' असा प्रश्न केला. त्यावर आदिवासी बांधव व चिमुकले काहीच बोलले नाहीत, पण याचवेळी समोरच्या रांगेत बसलेल्या व मोबाइलमध्ये व्हिडिओ घेत असलेल्या मुलीने रश्मी शुक्ला यांचे लक्ष वेधले.

मंचावर न जाता शुक्ला या तिच्याजवळ गेल्या व तुला व्हिडिओ घेता येतो, मला येत नाही, शिकवते का... असे म्हणून दाद दिली. तिच्याशी त्यांनी संवाद साधला व तिला दाद दिली. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग असून आदिवासी समुहातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचता येते, त्यामुळे ध्येय ठरवले तर यश नक्कीच मिळते, असे सांगितले. गर्देवाडासारख्या भागात पोलिसांना पोहोचता येत नव्हते, आता मदत केंद्र झाले आहे. यातून परिसरातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘दादालोरा खिडकी’ सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. शासन तुमच्यापर्यंत पोहोचले आहे, तेव्हा सुविधांचा लाभ घ्या , असे आवाहन त्यांनी केले.   नागरिकांची मने जिंकून त्यांच्याच सहकार्यानेच 

नक्षलवादाचा बीमोड करु, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक  संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक  अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर    अधीक्षक  एम. रमेश, उपअधीक्षक योगेश रांजनकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आदिवासींना कपडे, भांडी, मुलांना क्रीडा व शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.सूत्रसंचालन गर्देवाडा पोलिस मदत केंद्राचे सहायक निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले. सहा लाख नागरिकांना योजनांचा लाभप्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. ते म्हणाले, पोलिस अतिदुर्गम व दुर्गम भागात देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास प्रयत्नरत आहेत. पोलिसांच्या दादालोरा खिडकीतून विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. यातून आतापर्यंत पाच लाख ९६ हजार नागरिकांना लाभ दिल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRashmi Shuklaरश्मी शुक्ला