शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
2
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
3
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
4
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
5
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
6
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
8
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
9
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
10
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
11
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
12
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
13
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
14
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
15
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
16
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
17
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
18
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
19
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
20
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक संचालक अविरोध

By admin | Updated: November 4, 2016 00:11 IST

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या या बाजार समितीवर हमाल/मापाडी मतदार संघातून सेननवाज मेहबूब शेख हे अविरोध निवडून आले आहे.

चार आघाड्या मैदानात : विभाजनानंतर पहिलीच निवडणूकअहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या या बाजार समितीवर हमाल/मापाडी मतदार संघातून सेननवाज मेहबूब शेख हे अविरोध निवडून आले आहे.अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर ही होणारी पहिलीच निवडणूक आहे. १८ जागांसाठी ८८ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण ७ जागांसाठी २८, महिला मतदार संघातून २ जागांसाठी ७, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३ तर विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. सहकारी संस्था मतदार संघात ११ जागांकरिता ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण २ जागांसाठी ६, अनुसूचित जाती/जमातीच्या १ जागेसाठी ७ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या १ जागेसाठी ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. व्यापारी, अडते व प्रक्रियाकार मतदार संघात २ जागांसाठी ७ उमेदवारांचे अर्ज आहेत. ४ नोव्हेंबर रोजी या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या बाजार समितीसाठी सध्या ४ पॅनल रिंगणात उतरले आहे. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वातील भाजप व नाविसंचे एक पॅनल तर माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राकाँ समर्थकांची शेतकरी विकास आघाडी व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात एक पॅनल मैदानात आहे. याशिवाय गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजय नागुलवार यांच्या नेतृत्वातही उमेदवार पॅनल करून उभे आहेत. त्यामुळे चौरंगी सामना या बाजार समितीच्या निवडणुकीत होणार आहे. आजवर या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रस आघाडीचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)