लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदर्श मित्र मंडळ पुणे व गडचिरोली पोलीस विभागाच्या पुढाकाराने प्राणहिता उपपोलीस मुख्यालय अहेरीजवळ असलेल्या आत्मसमर्पीत नक्षलवाद्याच्या वस्तीत एक अंगणवाडी सुरू करण्यात आली. येथे २० ते २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी लर्निंग प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात आल्याने आता आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.पुणे येथील चाटे शिक्षण समुहाचे फुलचंद चाटे यांनी या अंगणवाडी केंद्राला ई-लर्निंग प्रोजेक्टर उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील ही डिजिटल झालेली प्रथमच अंगणवाडी ठरली आहे. येथील मुले ई-लर्निंगद्वारे शिक्षण घेणार आहेत. नवीन प्रोजेक्टर पाहून येथील विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ई-लर्निंग प्रोजेक्टरचे उद्घाटन उडाण फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष मंथनवार यांनी केले. यावेळी रोमित तोंबर्लावार, आदर्श मित्र मंडळ पुणेचे उदय जगताप उपस्थित होते.
नक्षलवाद्यांच्या मुलांनाही डिजिटलचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:44 IST
आदर्श मित्र मंडळ पुणे व गडचिरोली पोलीस विभागाच्या पुढाकाराने प्राणहिता उपपोलीस मुख्यालय अहेरीजवळ असलेल्या आत्मसमर्पीत नक्षलवाद्याच्या वस्तीत एक अंगणवाडी सुरू करण्यात आली.
नक्षलवाद्यांच्या मुलांनाही डिजिटलचे धडे
ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिलीच अंगणवाडी : आत्मसमर्पितांच्या वस्तीत झाली सुविधा