संप यशस्वी करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:27 AM2019-08-12T00:27:44+5:302019-08-12T00:28:27+5:30

विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

Determined to succeed | संप यशस्वी करण्याचा निर्धार

संप यशस्वी करण्याचा निर्धार

Next
ठळक मुद्दे२० आॅगस्टच्या आंदोलनाचे नियोजन : जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार विशाल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सुध्दा सहभागी होणार आहे. संपात सहभागी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. संघटनेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने संपात सहभागी होऊन सरकारला आपली ताकद दाखवावी, असा निर्धार रविवारी गडचिरोली येथे पार पडलेल्या सहविचार सभेत करण्यात आला.
जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेला संघटनेच्या विभागीय महिला संघटीका वनश्री जाधव, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कैलास नरोटे, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश आखाडे, प्रशांत ठेंगरी, दीपक सुरपाम, युवराज तागडे, किसन सोनुले, ए.पी. पाळबदे, वाय. एस. तांदळे, एस. एस. चौके, डी. बी. सुरपाम, सुरेश चव्हाण, कैलास कोरोटे, बंडू राठोड, राजू सोनटक्के, निकेश बन्सोड, घनश्याम हटेवार, विनय रामटेके, शरद दोहतरे, अनिकेत गायधने, शालू मेटे, सुषमा नन्नावरे, पायल गावंडे, आर. एस. पदा, मोहन दोडके, अमरदीप भुरले, खुशाल भुरसे आदी उपस्थित होते.
एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पेन्शन न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास निम्मी आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी करण्याविषयीचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक तालुका अध्यक्षाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. सरकारकडून पेन्शन मिळविणे हा आपला सर्वात मोठा लढा आहे. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेऊन सरकारला आपली ताकद दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.

Web Title: Determined to succeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा