या कारवायांमध्ये शहराच्या शिवाजी वार्डातील राहुल मदन वलके (३२ वर्ष) तसेच गांधी वार्डातील चंद्रकांत केवळराम ठाकरे (४२ वर्षे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी वार्डातील राहुल वलके याच्याकडून दोन हजार रुपये किमतीची अवैध देशी दारू व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त केली. दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकांत ठाकरे याच्याकडून ४० ग्रॅमचे ७० इगल प्रतिबंधीत तंबाखूचे पाॅकेट (किंमत 70 हजार रुपये), सुपर प्रिमीयम सुगंधित तंबाखू ५० पाॅकेट (किंमत १२ हजार ५०० रुपये), इगल तंबाखूचे ५० पाॅकेट (किंमत ३० हजार रुपये), जनम कंपनीचा सुगंधित तंबाखू ६० पाॅकेट (किंमत ६० हजार रुपये) असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक डाॅ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात दारुबंदी पथकाने केली.