शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सर्व घटक संघटित होऊन समाजाची ताकद दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात श्री संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, विदर्भ तेली समाज महासंघ, संताजी सोशल मंडळ व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले.

ठळक मुद्देरामदास तडस यांचे आवाहन : तेली समाजाचा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात तेली समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज विविध जाती, पोटजातीमध्ये विखूरला आहे. तेली समाजातील सर्व घटक एकत्र आल्याशिवाय समाजाच्या समस्या सुटणार नाही. त्यामुळे तेली समाजातील सर्व घटकांनी संघटीत होवून एकतेचे दर्शन घडवावे आणि समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन प्रांतिक तेली समाज महासभेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांनी केले. सदर मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यासह विदर्भातील तेली समाज बांधव एकवटल्याचे दिसून आले.आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात श्री संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, विदर्भ तेली समाज महासंघ, संताजी सोशल मंडळ व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शक म्हणून माजी आ.देवराव भांडेकर, तेली समाज महासभेचे उपाध्यक्ष बबनराव फंड, विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षाङ्खठाकरे, तेली समाज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भरडकर, विदर्भ तेली समाज नागपूरचे सचिव प्रा.विठ्ठलराव निकुरे, प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रांतिक तेली समाज महासभा (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शिक्षण संस्था अध्यक्ष भाग्यवान खोब्राग्रडे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महासभेचे संघटक रमेश भुरसे, संतोष खोब्रागडे, प्रशांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपवधू-वर परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी, रघुनाथ शेंडे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्षा योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र भरडकर, संचालन रोशनी राखडे व चेतन आकरे, तर आभार घनश्याम लाकडे यांनी मानले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भगवान ठाकरे, कवडूजी समर्थ, वेणूदास सहारे, घनश्याम लाकडे, जगदिश ठाकरे, जीवनदास कोलते, गजानन ठाकरे, दिलीप सहारे, निलकंठ ठाकरे, रविंद्रङ्खठाकरे, मधूकर भांडेकर, देवाजी सोनटक्के, सुरेश भांडेकर, गोपीनाथ चांदेवार, सुधाकर दुधबावरे, प्रा.देवानंद कामडी आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला तेली समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.दीडशे वधू-वरांनी दिला परिचयतेली समाजाच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात उपवधू-वरांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५० उपवर-वधूंनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवून आपला परिचय दिला. उपवर-वधूनी आपल्याला जोडीदार कसा पाहिजे, तो कसा असावा, याबाबत आपले मत मान्यवर व उपस्थित तेली समाजबांधवासमोर व्यक्त केले.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवू -नेतेजिल्ह्यात तेली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. माझ्या यशस्वी राजकीय वाटचालीत या समाजाचा मोठा हातभार आहे. या समाजाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहिल. तसेच जिल्ह्यातील ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न व इतर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही खा. अशोक नेते यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस