चाचण्या वाढल्याने अहवालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:40+5:30

जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणे दिसणाºया किंवा कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ७४ लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन ठेवले होते. त्यापैकी ५७ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. या काळात त्यांची लक्षणे वाढली नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मुक्त करण्यात आले. १७ जण अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन आहेत. दरम्यान सोमवारी आणखी ३ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

Delays in reporting due to increased tests | चाचण्या वाढल्याने अहवालास विलंब

चाचण्या वाढल्याने अहवालास विलंब

googlenewsNext
ठळक मुद्दे३७ नमुन्यांची तपासणी : ११ चे अहवाल येणे बाकी, जिल्हाधिकाऱ्यांची कुरखेडाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नसला तरी रुग्णालयीन क्वारंटाईन ठेवलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले जात आहे. इतरही जिल्ह्यातून तपासणीसाठी येणाºया नमुन्यांची संख्या वाढत असल्यामुळे नागपूर येथील प्रयोगशाळेवरचा ताण वाढला आहे. परिणामी नमुन्यांचे तपासणी अहवाल येण्यास विलंब होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अजून ११ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणे दिसणाºया किंवा कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ७४ लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन ठेवले होते. त्यापैकी ५७ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. या काळात त्यांची लक्षणे वाढली नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मुक्त करण्यात आले. १७ जण अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन आहेत. दरम्यान सोमवारी आणखी ३ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
बाहेरील जिल्ह्यातून येणाºया प्रवाश्यांची संख्या अजूनही वाढतच आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत ही संख्या १६ हजार ६०८ झाली आहे. त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यापैकी २८७३ लोकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होणे बाकी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून कुरखेडात पाहणी
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुरखेडा येथे भेट देवून पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रूग्णालय, स्थलांतरीत लोकांसाठी तयार केलेला रिलीफ कॅम्प व क्वारंटाईन वार्ड या ठिकाणांची पाहणी केली. कुरखेडा येथे वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेल्या रिलीफ कॅम्पमध्ये १५७ लोकांचा समावेश आहे. यामध्ये परराज्यातील ६६, इतर जिल्ह्यातील ७०, जिल्ह्यातील वेगवेगळया तालुक्यातील ५ तर गोरगरीब गरजू १६ लोकांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
ठिकाणी प्रशासनाबरोबर विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती तसेच सीएसआरमार्फत मदत देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिंगला यांनी यावेळी कॅम्पमधील लोकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, आणि महसूल अधिकारी उपस्थित होते.
भेटीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गाबाबत तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षास भेट दिली. त्या ठिकाणी बेड, शौचालय सुविधा, पाणी व्यवस्था व इतर अनुषंगिक व्यवस्थांची पाहणी केली. शासकीय आदीवासी मुलींचे वसतिगृह कुरखेडा येथे कोरोना रूग्णांबाबत क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी आरोग्यविषयक सुविधांची पाहणीही त्यांनी केली.

Web Title: Delays in reporting due to increased tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.