दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:29+5:30

जिल्ह्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्करला, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. एकूण ७२ केंद्रांवरून सुरू असलेल्या लसीकरणासाठी आता नागरिक झुंबड करीत असल्याने केंद्रांवर पोहोचलेला लसींचा साठा दोन दिवसांतच संपून जात आहे. परिणामी, लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे. 

Delayed second dose? No worries! | दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

Next
ठळक मुद्देसाठा संपल्याने अनेक जण वंचित, काय हाेणार याचीच चिंता

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाचे वाढलेले प्रमाण आणि पटापट होणारे मृत्यू पाहून अनेकांना आता लस घेण्याची घाई झाली आहे. मात्र लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने लसीकरणात अधूनमधून खोळंबा येत आहे. त्यातच पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसची वेळ आलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पण, त्यात खूप काळजीचे किंवा घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्करला, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. एकूण ७२ केंद्रांवरून सुरू असलेल्या लसीकरणासाठी आता नागरिक झुंबड करीत असल्याने केंद्रांवर पोहोचलेला लसींचा साठा दोन दिवसांतच संपून जात आहे. परिणामी, लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे. 
ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही आणि आपला नंबर लागलेला असतानाही लस मिळत नसल्याने काही लोक तीव्र नाराजीही व्यक्त करताना दिसतात. विशेषत: ज्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि आता दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे असे लोक अधिक काळजी करताना दिसतात. दुसरा डोस वेळेत घेतला नाही, तर पहिला डोस निष्प्रभ ठरणार का? आपल्याला कोरोनाची लागण होणार का, असे प्रश्न त्यांच्या मनात उठत आहेत. मात्र दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा दिलासा अधिकाऱ्यांंनी दिला आहे.

२४ हजार लस उपलब्ध
 १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण सुरू झाल्याने लसीकरणासाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध लसी लवकरच संपत आहे.
काही ठिकाणच्या केंद्रांवर लसीचा साठा नसल्यामुळे ते केंद्र लसीकरणासाठी बंद ठेवण्याची वेळ आली होती. मात्र बुधवारी २४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत.
 १८ ते ४४ वयोगटासाठी अजून ५ ते ६ लसीकरण केंद्रे लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दीही कमी होईल.

 

Web Title: Delayed second dose? No worries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.