शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

देचलीपेठा आश्रमशाळेत ‘शिक्षणाचा आयचा घो’

By admin | Updated: February 4, 2015 23:13 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत देचलीपेठा येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्याध्यापकांसह माध्यमिक, प्राथमिक तसेच अधीक्षकांचे व प्रयोगशाळा परिचराचे पद रिक्त आहे.

मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे पदे रिक्त : आश्रमशाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा इशारादेचलीपेठा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत देचलीपेठा येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्याध्यापकांसह माध्यमिक, प्राथमिक तसेच अधीक्षकांचे व प्रयोगशाळा परिचराचे पद रिक्त आहे. शिक्षकांअभावी या आश्रशाळेत केवळ गणित व मराठी विषयाचेच अध्यापन सुरू असून अन्य विषयाच्या अध्यापनाला बगल देण्यात आली आहे. या आश्रमशाळेत अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याने या आश्रमशाळेत ‘शिक्षणाचा आयचा घो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. देचलीपेठा आश्रमशाळेत इयत्ता १ ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. १ ते १० वी या वर्गात एकूण ३५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचे पद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. प्राथमिक शिक्षकांचे एक व पदवीधर शिक्षकांचे एक पद रिक्त आहे. माध्यमिक शिक्षकांचे तीन पद रिक्त असून महिला व पुरूष दोन्ही अधीक्षकांचे पद रिक्त आहे. त्यामुळे अधीक्षकांचा प्रभार प्राथमिक शिक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. प्रयोगशाळा परिचराचे पदही रिक्त आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विचारणा केली असता, केवळ गणित व मराठी विषयाचे अध्यापन सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थी पटसंख्येनुसार या आश्रमशाळेत पुरेसे स्वच्छतागृह व शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज सुविधेसाठी असलेले विद्युत जनित्र नादुरूस्त असून शोभेची वस्तू बनली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित पालक सभेत पालकांनी आश्रमशाळेतील समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. देचलीपेठा आश्रमशाळेतील रिक्त पदे न भरल्यास आश्रमशाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)