शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

वृध्देचा बळी घेणाऱ्या कळपातील हत्तीणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 12:08 IST

वाढोणा येथील घटना : पीक संरक्षणासाठीच्या तारेत सोडला होता विद्युत प्रवाह

जोगीसाखरा /वैरागड (जि. गडचिरोली) :  रानटी हत्तीच्या हल्ल्यात वृध्द महिलेचा बळी गेल्याची घटना २९ डिसेंबरला मध्यरात्री आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे घडली होती. याच जंगल परिसरातील वाढोणा येथे ३१ डिसेंबरला पहाटे एका हत्तीणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतात पिकाच्या राखणीसाठी तारेत सोडलेल्या विद्युत प्रवाहाने   तिचा घात झाला. 

आरमोरी तालुक्यातील वाढोणा येथील रघुनाथ नारनवरे यांनी आपल्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणातील तारेत विद्युत प्रवाह सोडला होता. ३१ डिसेंबरलापहाटे तीन वाजता या तारेस स्पर्श झाल्याचे हत्तीणीचा बळी गेला.  अजस्त्र हत्तीणीला पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोंडणे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा नोंदवून अधिक तपास केला जाईल, असे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.ड्रोनमध्ये हत्तीण आढळली मृतावस्थेतया भागात रानटी हत्तींवर वॉच ठेवण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. एका कॅमेऱ्यात पहाटे तीन वाजता ही हत्तीण मृतावस्थेत आढळली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली असता विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली.  शंकरनगर येथे एक वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर याच कळपातील हत्तीणीचाही मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांनी धुडगूस घातल्याने उत्तर गडचिरोलीत सध्या भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग